*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
“स्मृति भाग ७*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण आता *लघुयम स्मृतिचा* विचार करु .
७)लघुयम स्मृति—या स्मृतिमधे तसे नानाविध प्रायश्चित्त विधानाचेच वर्णन आलेले आहे . काही ठिकाणी यज्ञ , तलाव वा विहीर निर्माण विधानाचे श्लोक असल्याचा उल्लेख मिळतो , पण माझ्या वाचनात नाही . तसा एकच श्लोक येतो , तो कसा ? पुढे येईलच . असो. पण ही स्मृति वाचतांना नजरेचा वेध घेणारे श्लोक पुढीलप्रमाणे —
*आत्मानं घातयेद्यस्तु रज्ज्वादिभिरुपक्रमैः ।*
*मृतोSमेध्येन लेप्तव्यो जीवतो द्विशतं दमः|*
जो मनुष्य दोरी आदि उपायांनी आत्महत्या करतो , त्या मेलेल्यास अमेध्याने ( म्हणजे पुरीषाने ) लेप करावे . जर तो जिवंत राहिला तर त्यास दोनशे मुद्रांचा दण्ड द्यावा .
यातून दोन गोष्टी कळाल्या . १)दण्ड द्यावा , या सूचनेने आत्महत्या करणे हा गुन्हा ठरतो , हे निर्विवाद झाले . २)दुसरे असे की आत्महत्या करणारास पुरीषाचे लेपाने जीवनदान मिळू शकते ! संपूर्ण वैद्यकशास्त्रात असा औषधीप्रयोग कुठे ही वाचावयास मिळत नाही !! फक्त किती वेळात लेप केला गेला पाहिजे , इ. बर्याच गोष्टी पुढे येतात . पण ही प्रयोग करुन पहाण्यासारखी गोष्ट आहे हे निश्चित ! आणि आत्महत्या करणारा जिवंत होवू शकत असेल तर कुणाला आनंद नाही होणार !!!!!
*अङ्गुष्ठमात्रस्थूलस्तु बाहुमात्रप्रमाणकः ।*
*सार्द्रश्च सपलाशश्च गोदण्डः परिकीर्तितः॥*
अंगठ्या एवढा जाड , एक हात लांब , ओला आणि पाने असलेला गोदण्ड असावा .
गोहत्या करणे पापच आहे . एवढेच नव्हे तर बांधणे , उठवणे , पाडणे , पळवणे , इ. सर्व गाईशी वागत असलेल्या व्यवहारात कशा वागण्याने पाप होते व प्रायश्चित्त घेतले पाहिजे , हे वर्णन येतांना गाईला वागवतांना दण्ड कसा असावा , याचे विधान आहे . बैलाला काठीने मारले म्हणून नोकराला नोकरीवरुन काढून टाकणारे माझे आजोबा अशा उदाहरणाने अजून डोळ्यासमोर येतात !
*न स्त्रिया वपनं कार्यं न च वीरासनं तथा ।*
*न च गोष्ठे निवासाSस्ति न गच्छन्तिमनुव्रजेत् ॥*
स्त्रियांचे मुण्डन करु नाही , त्यांना वीरासनात बसवू नाही , त्यांना गोठ्यात राहू देवू नाही आणि त्यांनी गाईंच्या पाठीमागूनही चालू नाही .
आमच्याकडे स्त्रीमुण्डन कधी आणि कसे सुरु झाले ? हा इतिहास संशोधनाचाच विषय ठरतो . कारण मुण्डन करु नाही , हेच विधान . शिवाय ज्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून मुण्डन सांगितले ते ही , सगळे केस वर उचलून फक्त वरचे दोन अंगुल कापावे असा निर्देश श्लोकातून मिळतो . तिने गोठ्यात राहू नाही व कुणी ठेवू नाही , एवढा स्पष्ट निर्देश ऋषिंनी दिला असतांना या गोष्टी आमच्याकडे घडलेल्या दिसतात ! मग ऋषि वाईट का स्मृतिंचे उल्लंघन करणारे नराधम ? तिने गाईंचे मागे चालू नाही , या लेखनामागे तिने गव्हारं ( भरपूर गाईंचा घोळका ) घेवून गावाबाहेर चारायला जावू नाही ! हा उद्देश असावा ! कारण तिच्याशी रानात एकटे पाहून कुणी कुकर्म करु नये !! ही दृष्टी . कशी बसवली असेल समाजाची घडी माझ्या पूर्वज ऋषिंनी ! नमस्कारच 🙏🙏 दुसरा शब्दच नाही .
*इष्टापूर्तं तु कर्तव्यं ब्राह्मणेन प्रयत्नतः ।*
*इष्टेन लभते स्वर्गं पूर्ते मोक्षं समश्नुते ॥*
ब्राह्मणाने प्रयत्नपूर्वक इष्ट ( यज्ञयागादि ) कार्य व पूर्त ( जनहिताचे ) कार्य केले पाहिजे . इष्ट कार्याने स्वर्गप्राप्ती व पूर्त कार्याने मोक्ष मिळतो . ( जनहिताच्या कार्यात जलाशय वा विहिरी इ. येतात . एवढाच उल्लेख एका श्लोकाने येतो . ) या श्लोकाने मी या आगोदर लिहिलेल्या गोष्टीस पुष्टीच मिळते , हे वाचकांचे लक्षात येईलच !!
*सगोत्रात्भ्रश्यते नारी विवाहात्सप्तमे पदे ।*
*स्वामीगोत्रेण कर्तव्यास्तस्याः पिण्डोदकक्रियाः॥*
विवाहातील सप्तपदी झाल्यावर स्त्री आपल्या वडिलांचे गोत्राने मुक्त होते . तिच्या पिण्ड व जलदानादि क्रिया पतिच्या गोत्रानुसार केल्या जातात .
☝ हा श्लोक देण्या मागचा उद्देश माझा वेगळाच आहे. ज्या स्त्रियांनी दोन आडनावे अट्टाहासाने लावण्याचा प्रयत्न केला ती त्यांची चूक म्हणावी का धाडस म्हणावे? हे मला कुणी समजावून सांगेल का ? कारण माझ्या संस्कृतीत स्त्री ही भोगवस्तू नाही ! तिची पातळी खूप उच्च आहे , हे मनुस्मति आदि अन्य ग्रंथाद्वारेच कळते ! तरी त्यांचे वागणे असे का ? त्यांना समर्पणाचा अर्थ नाही कळला का ? शंकाच आहे ! असो. मीच मत मांडत बसण्यापेक्षा विद्वानांना विचार करण्याची पुन्हा एक संधी सोडतो .😂😂
*दिवा सूर्यांशुभिस्तप्तं रात्रौ नक्षत्रमारुतैः ।*
*सन्ध्ययोरप्युभाभ्यां च पवित्रं सर्वदा जलम् ॥*
दिवसा सूर्यकिरणांनी तापलेले व रात्री नक्षत्र व वायुने असे दोन्ही संधिकाळी ( प्रातः काल व सायंकाल ) पाणी नेहमी पवित्र असते .
हा श्लोक देण्या आगोदर गंगाजल महत्व वा पावित्र्य पण दोनतीन श्लोकात वर्णित आहे .
आज एवढे पुरे वाटते . उद्या पुढील स्मति पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मीडिया*
*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*
सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.
सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच
५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*
अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*
अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*
एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*
या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*
अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध
१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा
*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*
नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.
*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*