– एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग.
केंद्रशाळा शेर्पे, तालुका कणकवली या शाळेला मान.
कणकवली
एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांनी सदिच्छा भेट दिली. त्या भेटी प्रसंगी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व स्पर्धा परीक्षा तयारी याबाबत शाळेचे कामकाज गौरवास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. सतत शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत होत असल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुकासह अभिनंदन केले. भेटीप्रसंगी रिद्धी राजू गर्जे या शाळेच्या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल तसेच इयत्ता पाचवी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये पाचवी व कणकवली तालुक्यात प्रथम आलेली विद्यार्थिनीचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक – दशरथ शिंगारे, मार्गदर्शक शिक्षक – अमोल भंडारी, राजू गर्जे,श्रीम. शारदा तांदळे यांचेही गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली . शाळेला लाभलेल्या लोक सहभागाबद्दल व दात्यांच्या दातृत्वाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी उपस्थित रामचंद्र आंगणे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग, संदेश किंजवडेकर गटशिक्षणाधिकारी कणकवली, सुहास पाताडे विस्तार अधिकारी शिक्षण प्रभाग तरळे, संजय पवार केंद्रप्रमुख कासार्डे, श्रीम निशा गुरव सरपंच ग्रामपंचायत शेर्पे, सुभाष शेलार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा शेर्पे, विलास पांचाळ उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, शिक्षक अमोल भंडारी, राजू गर्जे, श्रीम. शारदा तांदळे, आदी उपस्थित होते.