*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
संगीता देवकर यांच्या चार काव्यपंक्तींना आपल्या शब्दांत पुढे नेण्याचा प्रयत्न…
————————————-
निळ्या आभाळाखाली चूल ही मांडली उघड्यावर संसारात आमचा नाही कोणी वाली
अंगभर शुभ्र चांदणे लेवुन आभाळाचे पांघरूण
गार वारा झोंबतो अंगाला झोपतो तसेच मुडपून
—————————————
एक दिवस माझाही
रोज नवे घर आमचे, रोजच नवा ठिकाणा
चार भिंती नसती तरीही, जगण्याचा बहाणा
गगनचुंबी इमारतीच्या, कुंपणाची घेतो सवलत
सुखाची आणिक आमची, कधीच झालीय फारकत
चांदणे बघून सुचते काव्य, ज्याच्या डोईवर छप्पर
निळ्या नभाच्या निळाईचे, कौतिकही असते घटकाभर
ए.सी. मधल्या गारव्यात, अंगावर दुलई मखमली
दोन वेळची भ्रांत असता, ऊब शरीराची आपली
विपरीत परिस्थिती परि, उमेद नाही हरलेली
‘एक दिवस असेन माझा’ जिद्द मनामध्ये धरलेली
परस्परांशी जुळले आहेत, घट्ट बंध मनाचे
सुखदुःखाचे राहू सांगाती, सार्थक जीवनाचे
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.
*संवाद मीडिया*
*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*
*आमची खास वैशिष्ट्ये*👇
*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*
*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*
*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*
*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*
*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*
*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*
*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*