You are currently viewing स्मृति भाग ४
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्मृति भाग ४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग ४*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
विष्णुप्रोक्तधर्मशास्त्रात तेराव्या क्रमांकाचा एक श्लोक येतो .
*गर्भाष्टमे तथा कर्म ब्राह्मणस्योपनायनम् ।*
*द्विजत्वेत्वथसंप्राप्तेसावित्र्यामधिकारभाक्।*
म्हणजे गर्भस्थापनापासून आठवे वर्षी ब्राह्मण बालकाचा यज्ञोपवित संस्कार करावा , कारण यज्ञोपवित धारण केल्यानंतरच द्विज हा गायत्री (जपाचा ) चा अधिकारी होवू शकतो . हा अर्थ .
याठिकाणी जो उल्लेख आहे व्रतबंधनाचा तो गर्भावस्थेपासूनचा कालावधी धरलाय . म्हणजे जन्मानंतर सातव्या वर्षीच की ???? मग आम्ही आठवे वर्ष ( जन्मानंतर येणारे ) का धरुन बसलो इतके वर्ष ? हे मला काही समजले नाही . कारण बहुतेक मौंजी आठव्या वर्षीच करण्याचा वा घाईने उरकून घेण्याचा प्रघात मी लहानपणापासून पहात आलो आहे . याचे पुष्टीकरणार्थ मी बुधस्मृतीतील क्रमांक दोनचा श्लोक देत आहे .
*गर्भाष्टमे ब्राह्मणो वसंत आत्मानमुपनयेत् ।*
— ब्राह्मणाने गर्भावस्थेपासून प्रारम्भ करुन आठवे वर्षी वसन्त ऋतुत ( म्हणजे जन्मापासून सातव्या वर्षीच ना ? ) आपले उपनयन करावे .
असे उल्लेख असताना आम्ही कुठे चुकतो ! हे पहावयास हवे . इतर स्मृतीतील संदर्भ योग्यवेळी देईनच . असो .

३)लघुहारित वा हारित स्मृति—
यात सात अध्याय येतात . १)वर्णाश्रम धर्म , २)चातुर्वर्ण धर्म , ३)ब्रम्हचर्याश्रम धर्म , ४)गृहस्थाश्रम धर्म , ५)वानप्रस्थाश्रम धर्म , ६)सन्यासाश्रम धर्म , ७)योग वर्णनम् ।
ह्या स्मृतीत वानप्रस्थींसाठी शेवटी एक श्लोक येतो —

तपो हि यः सेवति वन्यवासः
समाधियुक्तः प्रयतान्तरात्मा ।
विमुक्तपापो विमलः प्रशान्तः
स याति दिव्यं पुरुषं पुराणम् ।।
जो वानप्रस्थी आपल्या चंचल मनास वश करुन समाधिस्थ होतो , तपश्चर्या करतो , पापरहित निर्मळ व प्रशांत रहातो , तो पुराण पुरुषाच्या दिव्य स्वरुपास प्राप्त करतो .
माझ्या नजरेत *समाज* हा पुराण पुरुष आहे . मग माणूस या पुरुषाच्या दिव्य स्वरुपास कधी प्राप्त होईल ? आमचे ऋषि एकांती परमात्म चिंतन करायचे व त्याचे ते प्रत्येक माणसात पाहण्यासाठी समाजात यायचे . शिवाय समाजात येवून समाज कसा रहातो ! , विचार करतो ! याचे निरिक्षण करुन मार्गदर्शन करत . पूर्वी वानप्रस्थी वनात जायचे . वनामधील राहणार्‍या मानवास आचार विचाराने सुसंस्कृत करण्याचा प्रयास ते करत होते . आज मांडीवर नातवाला झोपवून हळूच विनोदानं बोलायचे ” वानप्रस्थाश्रम सुरु आहे ! हळू बोला ! नाहीतर तो उठेल ! ” 😂😂 कशाला समाजाची बांधणी होईल ? आज वन राहिले नाही व वनात रहाणे जमणार नाही नोकरदारास ? पण रोज एका घरी जावून निस्वार्थ , निरपेक्षतेने गीता , श्लोक , बोधकथा , उत्तम आचारविचार काहीतर सांगू शकतो ? ते ही जाणे समोरचा समाजबांधव माझा आहे या नात्याने गप्पा म्हणून ! त्याशिवाय हा पुराण पुरुष दिव्य दर्शन काय देईल !! आपली मते भिन्न असू शकतात !! मी तर शब्दपामर व विचार पामर आहे . गोड करुन घ्यावे .
शेवटच्या अध्यायात ज्याचा जो वर्ण असेल त्याने तसे धर्माचरण करावे , हे सांगतांना ” आपत्कालास सोडून ” असा प्रयोग केला आहे . किती दूरदृष्टी असावी ?
*स्वधर्मं ये तु तिष्ठन्ति ते यान्ति परमां गतिम्।*
असे म्हटले आहे . म्हणजे जो स्वधर्मानुसार आचरण करतो तो उत्तम गतीला प्राप्त होतो , हे सांगितले आहे . आजची शिक्षण व्यवस्था ही हे नैतिक शिक्षण अजिबात देवू शकत नाही ! हा खेद आहे .
पुढील भाग उद्या पाहू .🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा