You are currently viewing विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम व सुतार काम प्रशिक्षण – प्रजीत नायर

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम व सुतार काम प्रशिक्षण – प्रजीत नायर

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम व सुतार काम प्रशिक्षण – प्रजीत नायर

१६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन

ओरोस

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार काम याबाबत प्रगत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून २९ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या लिंक वर जावून १६ ते २५ वयोगटातील दहावी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करावी. ३० विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिली.
यावेळी प्रभाकर सावंत, डॉ प्रसाद देवधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नायर यांनी, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने पुणे, धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांचेसोबत सामंजस्य करार करीत विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे, असे नायर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा