You are currently viewing शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत; यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होईल – माजी नगरसेविका दिपाली भालेकर

शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत; यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होईल – माजी नगरसेविका दिपाली भालेकर

सावंतवाडी :

 

सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उदघाटन माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत व यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होईल व भविष्यात देशाचे नाव रोशन करेल तसेच त्यांनी शिक्षकांचे कौतुक करत सौ. दीपाली भालेकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक भरत गावडे यांनीही या क्रीडास्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर, माजी मुख्याध्यापक भरत गावडे, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर, अजित सावंत, श्रीमती भंडारे , श्री. कित्तूर, कळसुळकर चे प्राथमिक मुख्याध्यापक प्रदिप सावंत, श्री. पोवार, सायली लांबर, श्रीमती सावंत, श्रीमती मीरा मुद्राळे, धोंडी वरक, संध्या बिंबवणेकर, प्राची ढवळ, दिप्ती सोनवणे इत्यादी मान्यवर सर्व शाळांच्या शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा