दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत वेताळगडावर माहितीदर्शक फलकाचे अनावरण
मालवण
आज रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी खरारे पेंडूर येथील वेताळगडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच गडावरील महत्वाच्या ठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत मार्गदर्शक फलक व झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
अपरिचित अशा या वेताळगडावर जाणाऱ्या दुर्गप्रेमीना गडावर जाणारी वाट, गडाचा इतिहास तसेच गडावरील महत्वाची ठिकाणे सहज दृष्टीक्षेपात यावी यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मार्गदर्शक फलक लावण्याची मोहीम आखाण्यात आली. यापूर्वीही दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे वेताळगडावरील चौकोनी पाण्याची विहीर स्वच्छता मोहीम व गडाच्या उत्तरेकडील दरवाजाचा शोध व स्वच्छता मोहीम आखण्यात आलेली होती. या मार्गदर्शक फलक मोहिमेअंतर्गत गडावरील गावडेवाडी मार्गे जाणाऱ्या वाटेवर एक, वेताळाच्या कोरीव मूर्ती जवळ एक, कोरीव तीन पावलांच्या जवळ तीन, बुरुज व दरवाज्याजवळ एक, भिंतीवजा बांधकामाजवळ एक, तलावांजवळ एक, पाण्याच्या टाक्याजवळ एक, गावडेवाडी मार्गे परत जाणाऱ्या वाटेवरील मार्गावर एक, गडाच्या मधोमध असलेल्या चौकोनी विहिरीजवळ गडाची माहिती व गडाच्या इतिहास तसेच गडाचा नकाशा असलेला एक फलक आणि याच विहिरीजवळ झेंडा लावण्यासाठी पोल उभारण्यात आला.
या मार्गदर्शक फलकांसाठी गजानन कांदळगावकर, प्रविण परब, संदिप राऊळ, सोहर्ष खानोलकर, वेदांत वेंगुर्लेकर, दत्तप्रसाद गोलतकर, बाबाजी परब, हृदयनाथ गावडे, प्रसाद सुतार, हार्दिक नाईक यांनी सौजन्य केले. सर्वांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले.
या मोहिमेसाठी गणेश नाईक, सुनिल करडे, समिल नाईक, समता वारंग, उत्कर्षा वेंगुर्लेकर, शिवाजी परब, अनिकेत गावडे, नेहा गावडे, प्रसाद पेंडूरकर, शितल नाईक, गार्गी नाईक, योगेश येरम, संकेत सावंत, स्वप्नील पालकर, अमोल भोगले, अक्षय कविटकर, दिपक सावंत, रामचंद्र नाईक, हृदयनाथ गावडे, संजय जाधव, रवी गावडे, सानवी गावडे, सोनाली गावडे, दुर्गेश गावडे, अक्षता गावडे यांनी सहभाग घेतला. सदर मोहिमेस खरारे पेंडूर चे माजी सरपंच रवी गावडे यांनी अल्पोपहाराची सोय केली.
*संवाद मीडिया*
*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*
*आमची खास वैशिष्ट्ये*👇
*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*
*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*
*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*
*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*
*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*
*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*
*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*