You are currently viewing मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव‌मध्ये सेवा सहयोग मार्फत दप्तर वाटप

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव‌मध्ये सेवा सहयोग मार्फत दप्तर वाटप

*मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव‌मध्ये सेवा सहयोग मार्फत दप्तर वाटप*

सावंतवाडी

मळगाव इंग्लिश स्कूल मळगांव‌ मध्ये “सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई” या संस्थेमार्फत शाळेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना 294 दप्तरे देण्यात आली.या प्रत्येक दप्तरामध्ये वर्ष भर पुरेल एवढं शैक्षणिक साहित्य देण्यात आले.या मध्ये वह्या, कंपास बॉक्स,या साहित्याचा समावेश आहे.
ही संस्था कोकणातील विविध शाळांना मदत करीत आहे. हे कार्य सतत 14 ते 15 वर्षे संस्था करीत असल्याचे आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिपक गावडे यांनी सांगितले.दिपक गावडे यावेळी असे म्हणाले की खेड्यात काही गरीब मुलांना दप्तर सुध्दा मिळत नाही.हे न्यूनगंड त्यांच्यामध्ये राहू नये.यासाठी
मी जेंव्हा या संस्थेमध्ये सहभागी झालो.तेव्हा ही संकल्पना मांडली असल्याचे म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी प्रशालेतील गरीब व होतकरू. १० विद्यार्थ्यांना शाळेचा युनिफॉर्म देऊ असे सांगितले.या पुढेही आपण मदत करण्याचा प्रयत्न करू ते मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे माजी विद्यार्थी संदिप सामंत यांचे मित्र असुन त्यांनी आपल्या प्रशाळेसाठी आपल्या मित्रांला मदत करण्याची विनंती केली .त्यांनी विनंती ला मान देऊन सरासरी तीन लाखांची शाळेला दप्तर दिली.यासाठी मळगांव ऐक्यवर्धक संघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ यांनी सुध्दा वेळोवळी पाठपुरावा करत असल्याचे दिपक गावडे सर म्हणाले
यावेळी मुख्याध्यापक श्री फाले सरांनी प्रास्ताविक केले व या सहकार्य बद्दल आभारही मानले व कौतुक ही केले
यावेळी या कार्यक्रमाला प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री फाले सर, पर्यवेक्षक श्री कदम सर ,स्कूल कमिटी चेअरमन श्री मनोहर राऊळ, मळगांव ऐक्यवर्धक संघाचे कार्याध्यक्ष श्री नंदकिशोर राऊळ ,माजी विद्यार्थी नार्वेकर, संदिप सामंत
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तिवरेकर सर यांनी केले.व आभार मुख्याध्यापक श्री फाले सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा