*रेशन कार्ड वर वितरित होणाऱ्या तांदळा संदर्भात मनसेची तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला धडक*
सावंतवाडी
आज सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आले. हे तांदूळ जर हाताने दाबले असता ते फुटत नाही. दाताने चावले असता तसेच शिजवल्यानंतरही चिवट लागतात अशी तक्रार सावंतवाडी तालुक्यातील आरोस तिरोडा नाणोस शेर्ले माडखोल इन्सुलि न्हावेली आदी भागातून बऱ्याच लोकांनी मनसे कडे केली. या विषयाला अनुसरून मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत, सुरेंद्र कोठावळे, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी,नंदू परब, प्रणित तळकर,दिलीप नाईक, गुरुनाथ नाईक, व इतर मनसैनिक यांनी तहसीलदार यांची भेट घेतली असता पुरवठा अधिकारी यांनी हा तांदूळ प्लास्टिकचा नसून 45 प्रोटीन युक्त तांदूळ असल्याचे सांगितले. हे तांदूळ खाण्यायोग्य असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. पण या तांदळाच्या बाबतीत ग्रामीण भागात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हे तांदूळ जर खाण्यायोग्य आहेत तर तहसील कार्यालयामार्फत याची जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी मनसे मार्फत प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील तसेच तहसील कार्यालयामार्फत सुद्धा हे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची ग्वाहि सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांनी दिली तर सावंतवाडीत ग्रामीण भागात संभ्रम दूर होण्यासाठी जनजागृती करा अशी मागणी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली तशी जनजागृती करण्याची ग्वाही तहसीलदार श्री श्रीधर पाटील यांनी दिली.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क :*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*