You are currently viewing तिलारी खोऱ्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाल्याने शेतकरी भयभीत

तिलारी खोऱ्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाल्याने शेतकरी भयभीत

तिलारी खोऱ्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाल्याने शेतकरी भयभीत

दोडामार्ग

विजघर-बाबडे परिसरात मंगळवारी रात्री टस्कर थेट लोकवस्तीजवळ आला. पाहताक्षणीच त्याला ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. तिलारी खोऱ्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बांबडे येथे आहे.परिसरात मंगळवारी रात्री टस्कर थेट लोकवस्तीजवळ आला. पाहताक्षणीच त्याला ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. तिलारी खोऱ्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिलारी खोऱ्यात दाखल हत्ती काही महिन्यांपूर्वी माघारी परतले होते. त्यामुळे येथील शेतऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र पावसाळा संपला अन् वीजघर परिसरात दोन दिवसांपूर्वी एक टस्कर दाखल झाला. लागलीच त्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती, फळ बागायतींचे नुकसान करण्यास सरुवात केली. तो टस्कर अन्नाच्या शोधात भ्रमंती करून लागल्याने मंगळवारी रात्री ८ वा.च्या सुमारास बांबर्डे परिसरात लोकवस्तीजवळ आला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीची वेळ असल्याने व हत्ती नेमके किती असावेत याचा अंदाज बांधू न शकल्याने ग्रामस्थांनी कोणतीही जोखीम न पत्करता दुरूनच त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र याला न जुमानता टस्कराने तेथील केळी उध्वस्त केल्या. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. लोकवस्तीजवळ वावरणाऱ्या या टस्कराला वनविभागाने पिटाळून लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा