You are currently viewing कांदेपोहे

कांदेपोहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कांदेपोहे…*

चवदार किती हो कांदे पोहे चटकदार हो किती
आजतगायत किती ते खाल्ले नाही मोज न् मिती…

लग्न ठरवती कांदेपोहे
वधूपरीक्षा कांदेपोहे
चुलीवरच्या कढईमधले
…. कांदेपोहे
किसून खोबरे कांदेपोहे
शेवपेरूनी कांदेपोहे
लिंबू पिळूनी कांदेपोहे
तोंडाला हो सुटते पाणी काय वर्णावी महती
चवदार किती हो कांदेपोहे चटकदार हो किती…

पाहुणा आला कांदे पोहे
मधल्या वेळी कांदेपोहे
डब्यात नेण्या कांदेपोहे
उगाच केव्हा दडपे पोहे
खोवून नारळ कांदे पोहे
कोथिंबीर पेरून कांदेपोहे
हाडामांसी कांदेपोहे
कंटाळा ही कधी न आला चव ती टोकावरती
चवदार किती हो कांदेपोहे चटकदार हो किती ..

कुणी शोधले कांदेपोहे
साधेसुधे काम हे नव्हे
इतिहास घडवती कांदेपोहे
किती ही द्या ना कांदेपोहे
किती ही वेळा कांदेपोहे
चवदार तो चिवडा पोहे
लक्ष्मीनारायण चिवडा पोहे
पोह्यांचे साम्राज्य पसरले कांद्याच्या संगती
चवदार किती हो कांदेपोहे चटकदार हो किती…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी ३:३८

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा