कुडाळ न. पं. तर्फे दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप…
कुडाळ
कुडाळ नगरपंचायततर्फे बुधवारी दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुडाळमधील दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या २५ दिव्यांग बांधवांना हे अनुदान देण्यात आले. तसेच यावेळी कुडाळ नगरपंचायततर्फे दिव्यांग बांधवांना गुलाबपुष्प तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दिव्यांग नोंदणी यादी २०२३-२४ नुसार ६२ लाभार्थ्यांना हे अनुदान प्राप्त झाले आहे. दिव्यांग बांधवांना व्यवसायात वृध्दी मिळवून देण्यासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यरत आहे. बुधवारी कुडाळ नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या मुख्य उपस्थितीत हे अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेविका ज्योती जळवी, मुख्याधिकारी अरविंद नातू, प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, कर निरीक्षक पठाण, कर परीक्षक प्रिया तेरसे, लिपिक सागर कुंभार आदी उपस्थित होते. तर यावेळी ईशा वर्दम, नित्यानंद कुडाळकर, सुलोचना आळवे, सोनम आसोलकर, संजय आरेकर, अंकुश कुंभार, हेमंत राऊळ, शीतल पाटील, संदीप गोसावी, शामसुंदर माजगावकर, ज्ञानेश्वर धडाम आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी अंकुश कुंभार, शाम माजगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नगरपंचायतचे आभार मानून यापूर्वी अशा पद्धतीचा कार्यक्रम पार पडला नव्हता तो यावेळी साजरा करण्यात आला याबद्दल आभार व्यक्त केले.