You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर

बांदा केंद्रशाळेच्या चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर

*बांदा केंद्रशाळेच्या चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर*

*आळंदी येथील कार्यक्रमात होणार सन्मान*

*बांदा*

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांदा नं.१ केंद्र शाळेतील चार विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जाहीर झाले आहेत.संस्थेच्या वतीने सन२०२३मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना प्रेरणा मिळाली यासाठी पहिली ते दहावी पर्यंतच्या विविध विषयांच्या घेण्यात आलेल्या सहा स्पर्धांतून अधिकाधिक स्पर्धेत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुरस्कार जाहीर झाले असून बांदा केंद्र शाळेतील सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर,
समर्थ सागर पाटील, स्वामिनी लक्ष्मण तर्पे,निल नितीन बांदेकर
वरील या विद्यार्थ्यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या विद्यार्थ्यना हे पुरस्कार २४डिसेंबर रोजी आळंदी(पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार व गुणगौरव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कार विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, शांताराम असनकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील,प्रदिप सावंत, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले,या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये, केंद्र प्रमुख संदीप गवस यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा