You are currently viewing शितल एजन्सी द्वारे फोंडाघाट वासीयांना मालवण मधील कार्यक्रमचे केले नाडकर्णी यांनी लाईव्ह प्रक्षेपण

शितल एजन्सी द्वारे फोंडाघाट वासीयांना मालवण मधील कार्यक्रमचे केले नाडकर्णी यांनी लाईव्ह प्रक्षेपण

शितल एजन्सी द्वारे फोंडाघाट वासीयांना मालवण मधील कार्यक्रमचे केले नाडकर्णी यांनी लाईव्ह प्रक्षेपण

फोंडाघाट

अजित नाडकर्णी यांनी आपल्या शितल एजन्सी या दुकानाच्या बाहेर ६५ इंची टि.व्ही लावुन मालवण मधील नेव्ही कार्यक्रमाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फुट पुतळ्याचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी अनावरण केलेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविले. त्यामुळे लोकांना लाईव्ह कार्यक्रम पाहता आला.
रस्त्यावर उभे राहुन लोकांनी या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. त्याच वेळी अश्याच प्रकारे रामानंद सागर यांचे रामायण रविवारी सकाळी असायचे त्याची आठवण झाली अशी प्रतीक्रीया अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान आपल्या सिंधुदुर्गात येऊन एवढा वेळ देतात हे गौरवास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा