*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भास निष्प्रभी*
**************
रंगीबिरंगी चेहरे सारे
जगण्याचे बेगडी कंगोरे…
सांगा कसे ओळखावे
अंतरीचे मनसुबी मनोरे…
सारे गुढ जगी बेमालूम
सत्य सारे अतर्क्य अधुरे…
बेगडी हास्यातची रमावे
झेलीत सुखसंभ्रमी वारे…
पोकळ जगण्याची आंस
आज निष्प्रभी भास सारे…
कुठे शोधावे आज इप्सित
अनर्थात गुंतले हे जग सारे…
***********************
*रचना क्र. १५८ / २४/११/२०२३*
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)
*📞(9766544908 )*