*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*
Principle of management
🚩🚩The Great Maratha Warrior
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
The Management of Guru
आजकाल कोणत्या गोष्टीसाठी management लागत नाही तुम्ही सांगा, जीवनात घडणाऱ्या तसेच calender year किंवा मराठी महिन्यांनुसार येणाऱ्या प्रत्येक सण वाराचे management लागते. अहो, संपूर्ण दिवसाचेच management लागते असेही म्हणण्यास वावगं ठरणार नाही. मग घरात लग्नकार्य असो वा कुठे फिरायला जायचे असो की देवदर्शनाला जायचे असो. प्रत्येक गोष्टीसाठी management हे लागतेच नाही का?
त्याचबरोबर Commerce आणि management क्षेत्रात सर्वात सोपा असणारा विषय म्हणजे principle of management किंवा Business Management. जे विद्यार्थी या क्षेत्रात असतील त्यांनी अभ्यासला असेल किंवा काही विद्यार्थी अभ्यासत असतील. मित्रांनो, principle या शब्दाचा अर्थ तत्त्वे असा होतो. बरोबर ना. या principle of management मध्ये planning, organising, staffing, directing, controlling, decision making, leading, and motivating ही सर्व तत्त्वे समाविष्ट आहेत. परंतू, ही तत्त्वे आज केवळ अभ्यासापूर्ती मर्यादित नसून याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या सरत्या आयुष्यात सहजतेने होत असतो. मुख्यत्वे या तत्त्वांचा यशस्वी व्यवसायात मोठा हातखंडा आहे. नाही का?.
आता या विषयाचा अभ्यास किती जणांनी प्रामुख्याने केला असेल आणि किती सखोल पद्धतीने केला असेल हे ज्याचे त्याचे त्यांना माहित. पण मी एक लेखक म्हणून नक्कीच या विषयाचा यथोचित पद्धतीने अभ्यास केला आहे. या विषयाचा बारकाईने अभ्यास करताना खूप काही गोष्टी निदर्शनास आल्या. आणि पुरातन इतिहासाचे धागेदोरे ही यात सापडले.
मित्रांनो, हे principle of management या विषयाचे किंवा वर सांगितल्याप्रमाणे principle of management या तत्त्वांचे जनक आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज होत, तुम्ही म्हणाल ते कसे काय? ज्या विद्यार्थ्यांनी किंवा या क्षेत्रातील लोकांनी या विषयाचा logically अभ्यास केला असेल त्यांना हे नक्कीच लक्षात येईल. असो.
होय. या तत्त्वांचे जनक आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज होत. असे मी मानतो. मुळात principle of management मध्ये सांगितलेली सर्वच तत्त्वे शिवाजी महाराजांच्या अंगभूत होते. राजांनी या तत्वांच्या साहाय्याने हे स्वराज्याचे आरमार प्रस्थापित केले. ते कसे ते तुम्ही बघा.
शिवाजी महाराजांचे ही तत्त्वे अंगिकारण्याची काही प्रक्रिया होती.
शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत सर्वात महत्त्वाचे आणि पहिले तत्त्व गणले जात होते ते म्हणजे controlling.
Controlling :
स्वराज्यावर होऊ घातलेले संकट परतून लावणार कसे या संदर्भात विचार केला जात असे. व रयतेवर होणारे हाल आणि अत्याचारांना सोबत असलेल्या मावळ्यांसमवेत पायबंद घातला जात असे. तसेच शत्रूच्या सैनिकांना स्वराज्यात धुडगूस घालण्यापासून रोखले जात असे.
Leadership :
शत्रू जेव्हा स्वराज्यावर चाल करून येत असत तेव्हा महाराज आपल्या शिलेदारातून एक त्या कार्यास सक्षम असा शिलेदार निवडत असत. त्या कार्याची सर्वतोपरी जबाबदारी त्या शिलेदारावर सोपवत असत. किंवा स्वराज्याच्या काही युद्धात जसे आपण बघितलेच आहे की अफजलखानचा वध तसेच लाल महालावर छापा या प्रकरणात महाराज स्वतः leader बनून जात असत आणि तो कार्यभार स्वतःवर सोपवत असत.
Planning :
महाराज स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवायचा कसा या बाबत मावळ्यांशी आणि शिलेदारांशी सल्लामसलत करत असत. शत्रूने आखलेले धोरण, हल्ले धुडकावून लावणे. तत्पूर्वी शत्रू कोणत्या बाजूने चाल करून येतो त्या दिशेचा मागोवा घेणे तसेच शत्रू पर्यंत पोहोचण्याच्या दिशा ठरवणे. स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या मार्फत खबरबात घेणे या सर्वांचे नियोजन महाराज युद्धाच्या वेळी युक्तीने करत असत. मग शत्रूचे सैन्य कोणत्या मार्गात जास्त आहेत किंवा कोणत्या मार्गाने गेले म्हणजे शत्रूचा डाव पलटवता येईल या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच स्वराज्याच्या प्रत्येक लढाईतून मराठ्यांची फत्ते होत असत.
Staffing :
आलेल्या शत्रूला सामोरे जायचे म्हणजे शत्रू किती गाफील राहू शकतो हे पहिले ओळखले जात असत. शत्रूकडे किती संख्येने फौज आहे, पायदळ, घोडदळ, तोफ, दारूगोळा किती या सर्वांची खातरजमा स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याकडून काढून शिलेदारांसोबत आपले मराठे सैन्य पाठवले जात असे. जर आपण महाराजांचा आणि पराक्रमी मावळ्यांचा इतिहास ऐकला असेल बघितला असेल तर एक गोष्ट लक्षात येईल मराठ्यांच्या सैन्यापेक्षा स्वराज्याच्या प्रत्येक युद्धात शत्रूचे सैन्य दहापट जास्त होते, परंतू त्या दहापट सैन्याचा पराभव करण्याची ताकद आपल्या मराठे सरदार, शिलेदार आणि मराठी सैन्याकडे होती, जसे तुम्ही पाहिले असेलच पन्हाळा किल्ला कोंडाजी फर्जंदने अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन लढला आणि त्या बेशक खानकडून काबीज केला, त्या नंतर पावनखिंड, सिंहगड असे कितीतरी युद्धाचे प्रसंग सांगता येतील.
Decision making :
आपल्याला माहित आहेच स्वराज्याच्या बाबतीतील सर्व निर्णय श्री छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांना विचारून तसेच आपल्या शिलेदारांशी, महापराक्रमी मावळ्यांशी चर्चा करून घेत असत. तसेच महाराज समोरचा शत्रू आणि त्याच्याकडील सैन्य किती बलवान आहे याचा सर्व बाजूने तर्क वितर्क लावून युद्धाची आखणी, गनिमी कावा ची मोहीम आखत घेत असतं. जी आजही देशाच्या बॉर्डरवर उभे असलेले देशाचे रक्षक, आपले भारतीय सैनिक वापरतात की ज्याला इंग्रजीतून surgical strike म्हणतात. जसे की 2016 मधील kashmir attack, 2019 मधील पुलवामा हल्ला या साठी वापरला गेला होता. होय तीच आपल्या छत्रपती शिवाजी राजांची संकल्पना गनिमी कावा. जो या दोन्ही वेळेस यशस्वी झाला होता. शिवाय स्वराज्याच्या प्रत्येक लढाईची महाराजांनी आखलेली परिणीती ही वेगवेगळ्या स्वरूपाची होती.
Organising :
स्वराज्यासाठी कोणतीही मोहीम आखायची म्हटली की महाराज सर्व गोष्टींची शहानिषा केल्याशिवाय,आणि पडताळणी केल्याशिवाय ती मोहीम हातात घेत नसत. कोणताही किल्ला स्वराज्यात आणायचा म्हटला किंवा लढाई कोणतीही असो सर्व मावळे, शिलेदार, सरदार यांच्याशी बातचीत करून एक दिवस ठरवला जात असे व त्या दिवसापासून ते गडावर विजयाचे तोरण बांधण्यापर्यंत ती लढाई अखंडपणे चालू राहत असे.
Motivating :
राजांच्या चपखल युद्धनीती मध्ये motivating म्हणजे उपदेश देणे हा एक महत्त्वाचा भाग (principle) होता. कारण स्वराज्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी राजे त्या मोहीमेस जाण्यापूर्वी सर्व मावळ्यांना, शिलेदारांना उपदेश करत असत. त्यांना लढण्यासाठी प्रोत्साहन देत असत. प्रत्येक मावळ्यांच्या अंगी हुरूप निर्माण करत असतं. युद्धात सामील असलेल्या प्रत्येक मावळ्यांना लढण्यास, शत्रूशी दोन हात करण्यास बळ यावे यासाठी महाराज त्यांना प्रेरित करत असत.
Directing :
स्वराज्याच्या मोहिमेचे नियोजन करण्यापूर्वी राजे युक्तीने शत्रूला लिखित पत्रे, खलिते, लिफाफे मार्फत पाठवून जेरीस आणले जात असत. आणि राजे शत्रूच्या पेचांना घाबरले असा आव आणायचा, दिखावा करायचा म्हणजे शत्रू गाफील राहील शिवाय मराठ्यांची फत्ते होईल. ही महाराजांची त्या मागची योजना होती.
मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या तत्वांच्या आधारावर आज अवघे स्वराज्याचे साम्राज्य उभे केले. पुढे याच तत्वांचा आधार घेत क्रांतिकारक, शुर सेनानी नेते, महापुरुष यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कालांतराने management गुरू एल्टन मायो, हेन्री फेयोल, फ्रेडरिक टेलर यांनी आणखी काही तत्वे विकसित केली. जी बिझनेस, व्यवसायात वापरली जातात.
मित्रांनो, principle of management या विषयाचे साधर्म्य नक्की समजून घेत चला, हा विषय नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, तुमच्या जीवनात ही परिवर्तन घडेल, आयुष्याच्या क्षणाक्षणाला या principle ची गरज आपल्याला भासत असते तेव्हा, हा विषय समजून घेण्यास, कठीण वाटत असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आठवत चला, महाराजांचे प्रसंग आठवत चला, महाराजांचे चरित्र आठवत चला, तुम्ही एक दिवस नक्की या विषयात तसेच तुमच्या पुढील आयुष्यात, भविष्यात, उंच शिखरावर मजल मारल्याशिवाय राहणार नाही. खात्री आहे.
लेखक : नयन धारणकर, नाशिक©®
*संवाद मिडिया*
*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*
*Advt Link👇*
————————————————-
*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇
🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️
👉 *रेरा क्रमांक – P52900053094*
👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇
👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️
👉 डांबरी रस्ते🛣️
👉 आकर्षक इलेव्हेशन
👉 निसर्गरम्य परिसर🏡
👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️
👉 आजच बुक करा.. 📝
*👉संपर्क करा..!!📱*
*बिल्डर्स श्री. संजय सावंत*
9422381608 / 7276300298 / 8411066704
🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*