You are currently viewing वार्धक्याची गल्ली

वार्धक्याची गल्ली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

मनुष्य म्हातारा झाल्यावर जराजर्जर झाल्यावर अंथरुणाला खिळून राहतो तेव्हा त्याला मरणयातना सहन कराव्या लागतात अशावेळेस त्याच्या मनातील विचारांचा वेध घेण्याचा कवितेत प्रयत्न केला आहे.

 

*वार्धक्याची गल्ली* 

 

उगाच असाच मी बिछान्यावर

पहुडत असतो हल्ली

सुनसान वाटे गाव

अन् विरान वाटे गल्ली

 

दिवस भुर्रकन उडून गेले

साथी सोबती सोडून गेले

कुठला हा रोग जडला

वार्धक्याने मला घेरले

 

कशी करू मी देवाणघेवाण

विचार गप्पा कोणा सोबत

कुणी न भेटते न दिसते आता

आहे जवळ जे त्यांनाच नको सोबत

 

अवघड झाले जगणेच

जीव झाला नकोसा आता

गळून गेली पाने सुकलेली

उजाड वाटे जीवन आता

 

अश्रू नाही गळत दुःखाचे

दोन घास सुखाचे गिळत नाही आता

ज्यांच्या साठी जगलो

त्यांचाच राहिलो कुठे आता

 

जीवन जगता जगताना

जागवत होतो चेतना

किती सहाव्या वेदना अन्

वार्धक्यात मरण यातना

 

वाट प्रवासाची पाहतो अंतिम

बिछान्यावर पहुडत हल्ली

नको कुणा हे असले जगणे

नको वार्धक्याची गल्ली

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा