You are currently viewing नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात दिलजमाई

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात दिलजमाई

केसरकर म्हणतात, सिंधुदुर्गच्या विकासासाठी हे मनोमिलन !

सिंधुदुर्ग (विभावरी परब) :

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दहशतवाद्याच्या मुद्द्यावर राणेंच्या विरोधात दीपक केसरकर यांनी कडवा राजकीय संघर्ष केला होता. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात दीपक केसरकर यांची राजकीय ओळख निर्माण झाली होती. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष कायम होता.

दरम्यान बदलत्या राजकीय समीकरणामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो तर कोण कोणाचा शत्रू नसतो याचा प्रत्यय सिंधुदुर्गवासियांना केसरकर आणि राणे यांच्या दिलजमाई नंतर आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 2 =