सावंतवाडी :
केसरी येथील श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दि. २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे . या दिवशी मंदिर परिसरात हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो.निसर्गाचे वरदान लाभलेला मंदिर परिसर या दीपोत्सवामुळे अगदी मनमोहक दिसतो. देवसू दानोली व केसरी या तीन गावचे एकत्रित देवस्थान असलेला स्वयंभू हा अधिपती असून या दिवशी करलाई देवीला या उत्सवासाठी सवाद्य आणले जाते. सकाळपासून धार्मिक विधीला सुरुवात होणार असून दुपारनंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सूर्यास्ताच्या समयी होणारी श्री देव स्वयंभूची आरती ही वैशिष्ट्यपूर्ण असते. ही आरती बघण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात. या दिवशी श्रींच्या दर्शनासह आरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवसू दानोली केसरी येथील प्रमुख मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.