मालवण येथील रेडकर हॉस्पिटला हे संशोधन करण्यास मान्यता
मालवण
कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी होत असलेल्या संशोधनाचा महत्वाचा भाग म्हणून तयार होणारया लसीचे परिक्षण करण्यासाठी भारत सरकारतर्फे संपूर्ण भारतातील १२ हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली होती. धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटलची या परिक्षणासाठी निवड झाली होती. सदर परिक्षणाच्या पहिल्या दोन फेरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता अंतिम परिक्षणासाठी गोव्या बरोबरच मालवण येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला देखील हे संशोधन करण्यास मान्यता मिळालेली आहे. तसेच परिक्षणासाठी १५० लसींचा कोटा मंजूर झालेला आहे. संबंधित चाचणीसाठी, स्वंयसेवक म्हणून भाग घेवू इच्छिणा-या सर्वांना ही एक सुवर्ण संधी आहे. स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या आधारकार्डचा दोन्ही बाजूंचा फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे. नोदणी ची अंतिम तारीख शुक्रवार ११ डिसेंबर २०२० पर्यंतच आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर नोंदणी होणार आहे. आधारकार्डचा फोटो पाठविण्यासाठी तसेच यासंदर्भातील आपल्या कोणत्याही शंका निवारणासाठी आपण डॉ. रामचंद्र चव्हाण यांच्याशी (९४२३३०२७२०) तसेच रेडकर हॉस्पिटल(०२३६५/२५२११५)या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मालवण येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे