You are currently viewing मालवणात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ.

मालवणात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ.

मालवणात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ…

पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ प्रदर्शनाचे आयोजन

मालवण

येथील किल्ले सिंधुदुर्गवर साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी समाजातर्फे येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित चार दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उदघाटनाला मायनाक भंडारी यांच्या तेराव्या वंशजानी उपस्थिती दर्शवली. शिवकालीन शस्त्रे पाहण्यासाठी व त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या प्रदर्शनाला नागरिक व शालेय मुलांची गर्दी होत असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण या तीन संयुक्त संस्थेच्या वतीने या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून २६ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मायनाक भंडारी यांचे तेरावे वंशज अलिबाग येथील मायनाक बंधू व मालवण येथील पांडुरंग मायनाक तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारी समाज कार्याध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रमण वायंगणकर, मालवण तालुकाध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, प्रकाश कांबळी, जगदीश आडवीरकर, गणेश तळेकर, भाई गोवेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, मोहन वराडकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, मिलिंद झाड, रत्नाकर कोळंबकर, प्रवीण आचरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, श्याम वाक्कार, सचिन आरोलकर, पल्लवी तारी – खानोलकर, प्रमोद करलकर, आनंद तळाशीलकर, सचिन गवंडे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणी वेळी पार पडलेली कामगिरी तसेच आरमारात गाजविलेला पराक्रम याबाबत मान्यवरांनी माहिती देत मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा होत असताना मायनाक भंडारी यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा व शासनाने याची नोंद घ्यावी या उद्देशाने भंडारी समाज कार्यरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तसेच मुंबईतील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी. यामध्ये शिवकालीन शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी नागरिक, कॉलेज व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा