You are currently viewing डेगव्याचे शिवमय व्यक्तिमत्व गुरूनाथ देसाई

डेगव्याचे शिवमय व्यक्तिमत्व गुरूनाथ देसाई

गुरूनाथ म्हटलं कि पांढरा शुभ्र सदरा लेंगा कपाळावर भगवा टिळा भरदार लांबसडक दाढी आणि चेहऱ्यावर कायम एक आश्वासक भाव असे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते. मुंबईतच्या विलेपार्ले येथील ईर्ला धोबीघाट परिसरात डेगव्यातले कृष्णाजी देसाई (भाटलेकर) यांच्या पोटी जन्म आणि बालपण पण त्याच परिसरात.
वडिल कृष्णाजी हे हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पूर्ण शिवमय झालेले होतेच. ते सुद्धा कायम भगवा सदरा वापरत आणि भगव्याचा इतका अभिमान कि रस्त्यावर पडलेला भगव्या रंगाचा कागदाचा तुकडा सुध्दा आदराने उचलून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावत असत. अशा आपादमस्तक शिवमय असलेल्या वडिलांच्या पोटी जन्माला झाल्यामुळेच कि काय जन्मतःच शिवसेनेची ओढ.
प्रथम एक शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता
नंतर शिवसैनिक.
शिवसेनेचा विभाग प्रमुख
शिवसेनेचा शाखा प्रमुख.
शिवसेनेचा नगरसेवक
शिवसेनेचा आमदार
महाराष्ट्र शासनाच्या समितीवर अध्यक्ष.
त्यानंतर गुरूनाथानी मागे वळून पाहिलेच नाही. विलेपार्ले भागात असलेल्या बहुतेक समित्यांवर त्यांची नियुक्ती केलेली आहे. विलेपार्ले येथील ईर्ला नवरात्रोत्सवाचे तर सर्वेसर्वा तेच आहेत. अंबामाता चौकात देवीच्या मंडपाची नेत्रदीपक सजावट आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा नवरात्रोत्सव तर कायमच सगळ्या पार्लेकरांचे आकर्षण आहे. विशेष म्हणजे रोज देवीच्या मंडपात होणारी दिड तासांची आरती ती तर त्यांनी कधीच चुकवली नाही.सगळच अगदी शिस्तबद्ध.
विलेपार्ले हा भाग खरा तर गुजरात्यांचा त्यात एक मराठी माणूस पाय रोवून उभा राहतो आणि आमदार पदापर्यंत पोहोचतो हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ती व्यक्ती डेगव्याची असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे.
समाजसेवा हि तर त्यांच्या रक्तातच भिनलेली आहे. आज त्यांच्या विभागात लहानथोरांचा हक्काचा माणूस कोण असेल तर गुरूनाथ देसाई. शिवसेना प्रमुखानी ह्या हिऱ्याची योग्य पारख केली आणि त्यांनी गुरूनाथाना आपल्या हृदयात जागा दिली. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीर सांगत असत कि गुरूनाथ माझा मानसपुत्र आहे. इतकी जवळिक आख्या महाराष्ट्रात कुणाला जमली नसेल. महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेचे राज्य होते त्यावेळी शिवसेनेच्या कुठल्याही मंत्र्यांला साहेबांच्या परवानगी शिवाय मातोश्रीवर प्रवेश नसायचा अगदी मनोहर पंतानासुध्दा अशावेळी गुरूनाथाना मातोश्रीवर थेट प्रवेश अगदी दिवाणखान्यापासून ते स्वयंपाकघरा पर्यंत सहज आणि विशेष म्हणजे माॅं साहेबांच्या हातची चहा पिऊनच ते माघारी येत. कल्पना करा किती मान असेल गुरूनाथाना.

इतक्या मोठ्या व्यापात ते गावकऱ्यांना मात्र विसरले नाहीत किंबहुना डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे ते अध्यक्ष आहेतच पण आधारस्तंभ आहेत. दरवर्षी डेगवे ग्रामस्थांचा कौटुंबिक मेळावा आयोजित करण्यात त्यांचा वाटा मोठा म्हणण्यापेक्षा तेच आयोजित करतात असे म्हटले तर योग्य दिसेल.कारण विलेपार्लेचा वातानुकूलित विश्वकर्मा हॉल,दोन अडिचशे माणसांचे लग्नासारखे भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम थाटमाट काय विचारू नका सगळं सगळं अगदी गुरूनांचीच कृपा.
डेगव्यात त्यांच्या उपस्थितीत बरेच कार्यक्रम झाले. सतत तीन वर्षे SSC चा 100% निकाल लावणाऱ्या सावंत मॅडमचा सत्कार आणि मानपत्र. तीनही वर्षी SSC ला यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप असे अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम झाले.
गावकऱ्यांबध्दल मात्र गुरूनाथाना विशेष प्रेम. एकदा वसईला त्यांच्या पुण्याई बंगल्यावर पुजेच्या निमित्ताने जाणे झाले. एकतर इतका लोकप्रिय आमदार म्हणजे किती लोक आले असतील तुम्ही कल्पना करा पण डेगव्यातले सात आठजण जेव्हा त्यांच्या नजरेला दिसले त्यावेळची त्यांची ती डोळ्यातली चमक, आत्मियता दिसली.
अशा या दिलदार व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. खर तर घरी जाऊनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या विचार होता पण कोरोनामुळे शक्य झाले नाही. तरी आमच्या हृदयाच्या आंतरिक भावना गुरूनाथांपर्यंत नक्कीच पोहोचतील यात शंका नाही. आई जगदंबा श्री.गुरूनाथजी आणि त्यांची सावली सौ.दर्शना वहिनी दोघांनाही उदंड आयुष्य देवो हिच समस्त डेगवेकरांच्यावतीने प्रार्थना

किशोर देसाई

 

मा.आमदार श्री.गुरुनाथ देसाई
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विलेपार्लेचे मा.आमदार तथा डेगवे गावचे सुपुत्र,डेगवेग्रामस्थ हितवर्धक संघाचे मा.अध्यक्ष श्री गुरुनाथजी कृष्णाजी देसाई यांचा आज दि.८ डिसेंबर २०२० रोजी वाढदिवस आहे.
त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या समस्थ डेगवे ग्रामस्थांच्या व त्यांच्या सर्व परीवारतर्फे खुप खुप हार्दिक शुभेच्छा!!
श्रीमाऊली, महालक्ष्मी, स्थापेश्वर या देवतांच्या कृपेने आपल्याला निरोगी आरोग्य, व उंदड आयुष्य लाभो अशी श्री जगदंबे चरणीं प्रार्थना करतो!!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐——————
:कार्यकारी मंडळ:
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबईचे सर्व सभासद,पदाधिकारी.महिला मंडळ.युवा कार्यकर्ते.हितचिंतक.
——————–

प्रतिक्रिया व्यक्त करा