You are currently viewing राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री

*राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी झाली. त्यावेळी सर्व केंद्रावरील स्पर्धकांना दृक्‌श्राव्य माध्यमातून शुभेच्छा देताना मुनगंटीवार बोलत होते. स्पर्धेच्या पारितोषिकांच्या मानधनामध्ये वाढ, परीक्षकांच्या मानधनामध्ये वाढ या बाबीही विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई केंद्रावरील स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक प्रमोद पवार, नाट्य अनुदान समिती सदस्या शैला सामंत, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व अभिनेता मकरंद पाध्ये, अभिनेते आनंदा कारेकर तसेच परीक्षक विनोद दुर्गपुरोहित, डॉ. समीर मोने, सुजाता गोडसे तर यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, ज्येष्ठ अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले तसेच परीक्षक वसंत सामदेकर, ईश्वर जगताप, प्राची गडकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन झाले. साहित्य संघ मंदिर येथे ‘अभिनय साधना, मुंबई’ या संस्थेने ‘मामला गडबड है!’ तर यशवंत नाट्य मंदिर येथे ‘इंम्पल्स नाट्य संस्था, मुंबई’ या संस्थेने सादर केलेल्या ‘या वळणावर’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरीत यंदा ६० संघांचे सादरीकरण होणार असून साहित्य संघ मंदिर, आणि यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे २८ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता एका नाटकाचे सादरीकरण होईल.

सातत्याने आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून यातून अनेक महत्त्वाची नाटके आणि रंगकर्मी उदयास आले आहेत. या स्पर्धेची तिकिटे १५ रुपये आणि १० रुपये, अशा अतिशय अल्प दरात उपलब्ध असून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा