You are currently viewing दिपक केसरकर लढणार…

दिपक केसरकर लढणार…

*दिपक केसरकर लढणार…*

*सावंतवाडी मतदारसंघात इच्छुकांमध्ये हलचल*

ना.दीपक केसरकर यांनी दीपावलीच्या पूर्वसंधेला जनतेला शुभेच्छा देताना “मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुन्हा विधानसभा लढवणार, लोकसभा लढवणार ही अफवा…..” असे वक्तव्य करून आपली पुढील दिशा स्पष्ट केली, त्यामुळे विधानसभा लढविण्याचे आणि जिंकण्याचे मनसुबे बाळगणारे माजी आमदार राजन तेली व राष्ट्रवादीच्या अर्चना घारे मात्र शांत झाल्याचे दिसून आले.
ना.केसरकरांच्या भूमिकेनंतर पडसात उमटले ते दोडामार्ग शहरात…! केसरकर यांच्या विरोधात दोडामार्ग येथे बॅनर लागला “भाई, आता तरी थांबा” असा संदेश लिहिला गेला. हा संदेश दीपक केसरकर यांनी मतदारसंघात कामे न केल्याने लागला की कुणी आपली अगतिकता या बॅनरच्या माध्यमातून दाखवून दिली..? असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी विषय दोन दिवस चघळला. तर सावंतवाडीत केसरकर यांचा फोटो असलेल्या बॅनर वरील केवळ त्यांचा फोटो फाटला गेला. केसरकर समर्थकांच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर पोलीस चौकशीत बॅनर फाडणारा ठरला मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. (मनोरुग्ण की व्यक्ती द्वेष्टा हा संशोधनाचा विषय)
केसरकरांच्या घोषणेनंतर काहींना आपण केलेल्या जुन्या नवसांची आठवण झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील चाळोबा देवस्थानला बकऱ्याचा नवस केला होता, तो दुसरी लोकसभा निवडणूक आली तरी देवाला वाट पाहत ठेवणाऱ्यांना त्याची आठवण झाली आणि नवस फेडण्यासाठी वार रविवार ठरला. नवस फेडण्याचे औचित्य साधत वर्ल्डकपचा अंतिम सामना असतानाही खासदार दोडामार्ग पोचले. “आज नको, मॅच आहे. कोण येणार नाहीत” असे मेसेज गेले तरीही खासदार यांचा दोडामार्ग फिक्स झाला. दऱ्याखोऱ्यातील बीएसएनएल टॉवरची भूमिपूजने आटोपून खासदार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यासाठी भेडशी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात पोचले. “कुणीही बसतात म्हणून विश्रामगृहाला टाळे असते” असे उबाठा सेनेच्या तालुक्यातील प्रमुख नेत्याने सांगितले होते. परंतु केसरकर येणार म्हणून आरक्षित असलेल्या वनविभागाच्या विश्रामगृहात खासदार अचानक पोचले….तिथे केसरकर समर्थकांची मोठी गर्दी होती. केसरकर समर्थकांनी सामंजस्य दाखवत हसत हसत सर्वांना हस्तांदोलन केलं. पक्ष प्रवेश कार्यक्रम झाल्यावर खासदार बाहेर पडले.
“चाळोबाला बकऱ्याचा नवस करताना आम्ही पण होतो” हे मिश्किलपणे पत्रकारांना सांगायला केसरकर समर्थक गणेशप्रसाद गवस विसरले नाहीत. “गरज सरो वैद्य मरो” या उक्तीप्रमाणे गरज सरल्यावर लोक देवालाही विसरतात, आणि पुन्हा वेळ येते तेव्हा देवाच्या चरणांवर नाक घासतात अशी उशिरा नवस फेडल्याने दबक्या आवाजात रंगवून चर्चा सुरू होती. खासदार शाकाहारी असल्याने नवसाच्या बकऱ्याचे जेवण झाल्यावर निवडक कार्यकर्त्यांसह खासदार भेडशी येथील दिपावली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पोचले. कार्यक्रमास उपस्थिती दाखवून खासदार परतीच्या प्रवासाला निघाल्यावर केसरकर दोडामार्गला पोचले आणि त्यांनी रात्री उशिरा ११ नंतर भेडशी येथील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. मुख्य म्हणजे खासदारांच्या दौऱ्यात निवडक कार्यकर्ते असताना ज्या दोडामार्ग येथे असंतुष्ट नेत्याने केसरकरांच्या विरोधात बॅनरबाजी केली त्याच दोडामार्ग मध्ये केसरकरांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होती. दीपकभाई साठी थांबलेली गर्दी पाहिली असता नक्की दीपक केसरकर यांच्यावर नाराज कोण..? मतदारसंघातील कुणी की मतदारसंघात ज्यांचे नाव सुद्धा नाही असा कोणी..? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा