You are currently viewing एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष; यंदा विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉलमध्ये रंगणार महोत्सव

एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष; यंदा विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉलमध्ये रंगणार महोत्सव

*एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष; यंदा विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉलमध्ये रंगणार महोत्सव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष असून यंदाचा एकता सांस्कृतिक महोत्सव विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉल येथे २२ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात राज्यस्तरीय अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य, समूह नृत्य तसेच महिलांसाठी विशेष कोळी नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील तसेच महाविद्यालयीन कलावंतांनी या महोत्सवात सहभाग होण्याचे आवाहन एकताचे अध्यक्ष कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केले आहे. महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या ५०० कलावंतांना एकतातर्फे गौरविण्यात येईल. या महोत्सवातील समूह नृत्य स्पर्धांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची रोख पारितोषिकं अनुक्रमे १००००, ७०००, ५००० तसेच पारंपारिक नृत्य, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्यासही पारितोषिकं दिली जाणार आहेत. तसेच महिलांच्या विशेष कोळी नृत्यसाठी ७०००, ५०००, ३००० रूपयांची रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर असून विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिकं देण्यात येतील. तसेच महोत्सवाचा सांगता सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ गिरगाव येथील साहित्य संघ नाट्यगृहात १३ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. असे संस्थेचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, सचिव प्रकाश पाटील, प्रसिद्धी प्रमुख विष्णू सोनावणे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- ९२२०८९९१२०, ८६६८५०२६१९, ८१७७८७०५८६

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 5 =