You are currently viewing शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने गुरुवारी जि.प.समोर धरणे आंदोलन

शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने गुरुवारी जि.प.समोर धरणे आंदोलन

परजिल्ह्यातील शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत शिक्षक संघटना आक्रमक

तळेरे

रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून शिक्षकांना त्यांच्या परजिल्ह्यात गावी जाता येणार नाही, अशा आशयाचा आदेश नुकताच सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी काढला असून या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने तीव्र आक्षेप घेतला असून शिक्षकांना वेठीस धरला जाणारा सदर निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी संघटनेच्यावतीने 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत जि. प. कार्यालय ओरोस येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या संदर्भात जि. प. अध्यक्ष सिंधुदुर्ग, पोलिस ठाणे सिंधुदुर्गनगरी, जिल्हाधिकारी कार्यालय यांना लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. परजिल्ह्यामध्ये जाणार्‍या शिक्षकांमुळे कोरोना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो, असे शिक्षणाधिकारी यांनी एका पत्राद्वारे मुख्याध्यापक आणि संस्थांना कळविले आहे. शाळेसंदर्भात शासनाची भूमिका लवचिक असताना फक्त शिक्षकांवर अन्याय का? असा सवाल संघटनेने केला आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक, ड्रायव्हर आहेत, तेही जिल्ह्याबाहेर नियमित ये-जा करतात. असे असताना केवळ शिक्षकांना लक्ष करणे योग्य वाटत नाही. या निर्णयामुळे शाळेतील कोणत्याही कर्मचार्‍यावर आपल्या कौटुंबिक कारणासाठी किंवा इतर गरजेच्या कारणासाठी शासनाचा जिल्हाबंदीचा आदेश नसताना केवळ सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने गेली आठ महिने त्रस्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जिल्हा बंदी करणे म्हणजे मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे, म्हणून सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांचा हा चुकीचा निर्णय शाळेतील कर्मचार्‍यांना नाहक त्रासदायक ठरत आहे. हा निर्णय त्वरीत रद्द व्हावा यासाठी गुरूवारी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संजय वेतुरेकर यांनी या पत्रकात दिली असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + six =