दर महिन्याला पक्ष वाढीचा आढावा घेणार – रविंद्र फाटक
कणकवली :
कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण, वैभववाडी या पाच तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. आयोजित बैठकी प्रसंगी श्री रविंद्र फाटक यांनी उपस्थित राहून संघटना वाढीचा आढावा घेतला. यावेळी बैठकीत संघटना बांधणी, तसेच विकास कामाना निधी शासकीय कमिटीच्या नेमणुका व संघटना बांधणी बाबत येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. निधी आणि जिल्हा नियोजन सह शासकीय कमिटी बाबत मंत्री दिपक केसरकर, उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवतो. तसेच पुढील महिन्यापासून प्रत्येक तालुक्यात मी स्वतः येऊन बैठक घेणार असे फाटक यांनी सांगितले.
येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक साठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. येत्या काळात शासकीय कमिट्यावरील प्रशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच केल्या जातील, असे ही फाटक यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,विधानसभा प्रमुख संदेश पटेल,बबन शिंदे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, योगेश तुळस्कर,राजा गावकर,अमोल लोके,भास्कर राणे,महेंद्र सावंत,शेखर राणे,हरेश पाटील,दिनेश गावकर,सिद्धी शिरसाट,शीतल सावंत, कणकवली महिला तालुकाप्रमुख ्प्रिया टेमकर,नगराध्यक्ष साक्षी प्रभू, पाचही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.