You are currently viewing तळकट येथील खेळ पैठणीची स्वरा देसाई ठरली मानकरी

तळकट येथील खेळ पैठणीची स्वरा देसाई ठरली मानकरी

*तळकट येथील खेळ पैठणीची स्वरा देसाई ठरली मानकरी*

*बांदा*

ग्रामसेवा मंडळ तळकट कट्टा मुंबई व तळकट ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या स्पर्धेत स्वरा संतोष देसाई हिने प्रथम क्रमांक मिळवत पैठणीची मानकरी ठरली.
गावातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी रंजनकला नाट्य मंडळाच्या मैदानावर संपन्न झालेल्या या खेळात गावातील महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष दीपक मळीक,तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम नांगरे,विनायक सडेकर,निलेश धुरी, रामचंद्र नाईक ,शिक्षक मनोहर झेंडे,सुरेश काळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
बांदा केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक जे.डी.पाटील व मोरगाव शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती पाटील या उभयतांनी या खेळाचे बहारदार सुत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली.
या खेळातील प्रथम क्रमांकाची पैठणी स्वरा संतोष देसाई, द्वितीय क्रमांक ची पैठणी भाग्यश्री भरत देसाई, तर तृतीय क्रमांकाची पैठणी रूचिरा राजन मळीक यांनी मिळवली तर चतुर्थ क्रमांक समिक्षा सचिन राऊळ व पाचवा क्रमांक रश्मी रामदास देसाई यांनी मिळवला असुन या दोघींना नेकलेस भेट देण्यात आला. या खेळादरम्यान गावातील लहान मुलांसाठीही व महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम घेऊन दहा जणांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक मळीक यांनी भविष्यात गावात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा