You are currently viewing मंत्री केसरकर यांनी  केलेल्या कामाची माहिती हवी असेल तर आमनेसामने या –  शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस  यांचा इशारा

मंत्री केसरकर यांनी  केलेल्या कामाची माहिती हवी असेल तर आमनेसामने या –  शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस  यांचा इशारा

मंत्री केसरकर यांनी  केलेल्या कामाची माहिती हवी असेल तर आमनेसामने या –  शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस  यांचा इशारा

दोडामार्ग

कणकवली,पुणे,मुंबईची पार्सल या मतदारसंघात का आणता? हिंमत असेल तर स्थानिक उमेदवार द्या आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांना निवडून आणा.मंत्री केसरकर यांनी काय कामे केलीत याची माहिती हवी असेल तर आमनेसामने या,असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
ते म्हणाले, मंत्री केसरकर यांच्या विरोधात बदनामीचे फलक लावून तुम्ही जिंकणार नाहीत,घोडा मैदान जवळ आहे,मैदानात या,कोणाला निवडून द्यायचे ते लोक ठरवतील.अशा प्रकारे फलक लावून काहीही फरक पडणार नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बांदा दोडामार्ग रस्त्यावरून पण खूप घाणेरडे राजकारण करण्यात आले; तरीही केसरकर तिसऱ्यांदा निवडून आले कारण लोकांना विश्वास आहे की या मतदारसंघाला तेच न्याय देवू शकतात .ठाकरे गटाचे शैलेश परब यांचे नाव न घेता ते म्हणाले कुणीतरी मुंबईतून गणपतीला येतो आणि सांगतो मी निवडणूक लढवणार आहे,राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांचे नाव न घेता ते म्हणाले,कुणीतरी पुण्यातून येतात,गावागावात फिरतात आणि म्हणतात मी उभी राहणार आहे.भाजपचे raajan तेली यांचे नाव न घेता ते म्हणाले कुणीतरी कणकवलीतून येतो आणि मीच उभा राहणार म्हणतो. ही सगळी पार्सल बाहेरची का? स्थानिक कुणीच नाही का? मंत्री केसरकर हेच एकमेव स्थानिक उमेदवार आहेत आणि तेच योग्य उमेदवार आहेत.खरे तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार बोलून दाखवला होता,पण मतदार आणि पक्षश्रेष्ठींनी मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विधानसभा लढवायची गळ घातली म्हणून त्यांनी आपण चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले.त्यामुळे काहींना पोटशूळ उठला आणि त्यांनी बदनामी सुरू केली. त्या प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करतो असे सांगून ते म्हणाले हिम्मत असेल तर समोर येऊन विरोध आणि बदनामी करा,मग बघू.
ग्रामीण रुग्णालयाबद्दल ते म्हणाले,पगार दिला नाही म्हणून डॉक्टर गेले त्याला मंत्री केसरकर जबाबदार नाहीत.त्यांना पगार देणारी स्वतंत्र एजन्सी आहे.त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष असते.ते काम त्यांनी करायला हवे होते;पण त्यांना कुणी दोष देत नाही,सगळे खापर मंत्री केसरकर यांच्यावर विनाकारण फोडले जाते.मंत्री केसरकर यांनी जेवढी कामे केली तेवढी कुणीच केलेली नाहीत.त्याची माहिती हवी असेल तर आमने सामने या.उगाच बदनामी करु नका असे सांगून अशा घणेरड्या आणि विकृत प्रवृत्तीचा आपण निषेध करतो असेही ते म्हणाले.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस,अन्य पदाधिकारी प्रेमानंद देसाई,तुकाराम बर्डे, दादा देसाई,अर्चना गडेकर,योगेश महाले व अन्य उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 10 =