सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्याकरिता सन 2020 – 2025 या कालावधीसाठी एकूण 68 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. सिद्धीविनायक हॉल, रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे चिठ्ठ्या टाकून, काढणेत येणार आहे. ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंचांची पदे ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांनी सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन निश्चित केली असून कुडाळ तालुक्यातील आरक्षण पुढील प्रमाणे आहे. अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे प्रवर्ग -2 आणि महिलांसाठी – 3. अनुसुचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 9, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी – 9. खुल्या प्रवर्गासाठी 22 व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी – 22 पदे आरक्षित असणार असल्याचे तहसिलदार कुडाळ हे कळवितात.