You are currently viewing आता क्रिकेट पाठोपाठ कुडाळ बस स्थानक परिसरात आमदार फुटबॉल चषक भरवणार; मनसेचा इशारा

आता क्रिकेट पाठोपाठ कुडाळ बस स्थानक परिसरात आमदार फुटबॉल चषक भरवणार; मनसेचा इशारा

लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना करणार तारीख जाहीर : बनी नाडकर्णी

कुडाळ

कुडाळ बस स्थानक इमारत परिसरात लवकरच फुटबॉल चषक भरवणार व त्या फुटबॉल चषकला आमदारांच नाव देणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिला आहे. कुडाळ बस स्थानकाची जुनी इमारत सुस्थितीत असताना नवीन इमारत बांधण्यासाठी प्रशासनानं घाट घातला. तरी प्रशासनाने नवीन इमारतीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर करून फक्त दीड कोटी खर्च करून नवीन इमारत उभाण्यात आली. तीही अक्षरशः निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून. सद्यस्थितीत जी इमारत बांधण्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला त्या इमारतीला अक्षरशः तडे गेले आहेत. एकदम निकृष्ट दर्जाचं हे काम आहे ते पण अर्धवट परिस्थितीत काम करण्यात आल आहे. बस स्थानकाची सर्व कामे पूर्ण करून दिवाळी पूर्वी कुडाळ बस स्थानक प्रवाशांसाठी सोयीस्करपणे खुले केले जाणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण दिवाळी निघून गेली तरी अजूनही बस स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. लोकार्पण न केलेल्या बस स्थानकात एसटी गाड्या कश्या थांबतात? तसेच लोकार्पण करण्यासाठी प्रशासन कुठल्या मुहूर्ताची वाट बघत आहे? असे थेट सवाल यावेळी श्री नाडकर्णी यांनी उपस्थित केले आहेत.

स्थानिक आमदारांनी कुडाळ बस स्थानक लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुले करण्यासाठी लक्ष न घातल्यास कुडाळ बस स्थानक परिसरात फुटबॉल चषक भरवून त्या चषक ला आमदारांच नाव देणार असल्याची माहिती live महाराष्ट्र चॅनलशी संवाद साधताना श्री बनी नाडकर्णी यांनी दिली आहे. तसेच यावेळी लवकरात लवकर आमदार फुटबॉल चषक ची तारीख मनसे जाहीर करेल अशी माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा