You are currently viewing कणकवली नरडवे रोडचे रुंदीकरण 24 मीटरने न झाल्यास आंदोलन छेडणार!

कणकवली नरडवे रोडचे रुंदीकरण 24 मीटरने न झाल्यास आंदोलन छेडणार!

कणकवली नरडवे रोडचे रुंदीकरण 24 मीटरने न झाल्यास आंदोलन छेडणार

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा  सा.बा. विभागाला इशारा

कणकवली

कणकवली नरडवे रोड चे काम सध्या हाती घेण्यात आले असून, या रस्त्याची 24 मीटर पर्यंतची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. मात्र ही 24 मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असताना कमी जागेमध्ये रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. 24 मीटर या शासनाच्या ताब्यात असलेल्या जागे मध्ये हे काम न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना दिला आहे.

कणकवली शहरातील नरडवे चौक ते मुडेश्वर मैदाना पर्यत कणकवली शहराच्या हद्दीतील सर्व रस्ता मंजूर आराखड्याप्रमाणे 24 मीटरचा होणे गरजेचे आहे. या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात व विकासात भर पडणार असून या रस्त्यालगत असणाऱ्या फुटपाथ मुळे या रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी नागरिकांना सुविधा होणार आहे. शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज, भविष्यात होऊ घातलेले क्रीडांगण, नगरपंचायत चा गार्बेज डेपो, नळ योजनेच्या पाण्याची टाकी आदि कणकवली शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी या या रस्त्यावर अवलंबून आहेत. असे असताना केवळ 24 मीटर ऐवजी कमी जागेमध्ये हे काम करून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता हा 24 मीटर रुंदीचा करणे गरजेचे आहे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबत दुर्लक्ष केल्यास त्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा श्री. नलावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा