You are currently viewing १४ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव

१४ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव

देवगड :

 

 

श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी दीपावली पाडवा या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येतो या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान असंख्य भाविक सहभागी होत असतात या वर्षीचा दीपोत्सव दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये २१००० हजार दिव्यांची आरास होणार असून विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत. यासाठी सर्व रांगोळी कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये स्वर् निषाद मुंबई प्रस्तुत सुमधुर गाण्यांची मैफिल हा सांज संगीताचा कार्यक्रम सादर होणार असून त्याचे मुख्य संकलन हेमंत कुमार तवटे यांचे असून यात गायक हर्ष नकाशे, सागर कुडाळकर ,गायक नयन हार्प, ऍड सिद्धी परब सहभागी होणार आहे या संगीत मैफिलीचे निवेदन अक्षय सातार्डेकर हे करणार आहे दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजोलनाचा कार्यक्रम होणार होताच मंदिर व मंदिर परिसरातील दीप उजळले जाणार आहेत त्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे तसेच रात्री ८.३० ते ९ या वेळात सन्मान सोहळा व त्यानंतर ९ ते ९.३० पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा