You are currently viewing कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील मतदारांनी यापुढे सेनेला मतदान करायचे की नाही हे ठरवावे? – आ. नितेश राणे

कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील मतदारांनी यापुढे सेनेला मतदान करायचे की नाही हे ठरवावे? – आ. नितेश राणे

कणकवली :

विधानसभा निवडणुकीत २ नंबरची ५६ हजार मते शिवसेनेला कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात मिळाली. त्या जनतेचा शिवसेनेला विसर पडला आहे काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले देवगड आणि वैभववाडी तालुक्यात मुख्यमंत्री तिकडे फिरकलेच नाहीत. हा येथील जनतेचा केलेला अपमानच आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ७०० किलोमीटर प्रवास करून गावोगावी पोहोचले आणि जनतेला धीर दिला. नुकसान भरपाई देण्यास सरकारला भागपाडु असा विश्वास दिला. लोकनेता कसा असावा ? हे फडणवीस यांनी दाखवून दिले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३ तासाचा हॉलिडे पॅकेजचा दौरा करून अभिनेता कसा असतो ? हे दाखवून दिले. अश्या जोरदार टीका भाजपा आ. नितेश राणे यांनी आज झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत केली.

 

५६ हजार मते देणाऱ्या देवगड आणि वैभववाडी, कणकवली तालुक्यात मुख्यमंत्र्यांना जावेसे वाटले नाही का? तेथील मच्छीमार, आंबा बागायतदारांचे अश्रू पुसावेसे वाटले नाहीत. हा येथील मतदारांचा मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देवगडमधील मच्छीमारांची व्यथा समजून घेतली. नुकसान झालेल्या, वादळात मोडलेल्या हापूस कलम बागांमध्ये जाऊन जातिनिशी नुकसानीची पाहणी केली. आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना धीर दिला.

 

शिवसेनेला यापूढे मते मागण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल करतानाच कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील मतदारांनीच यापूढे सेनेला मतदान करायचे की नाही हे ठरवावे असे आमदार नितेश राणे म्हणाले. ज्या पद्धतीने आंबा, काजू बागायतीचे नुकसान या वादळात झालेले आहे.तसेच मच्छीमारांचे नुकसान झाले आहे, नुकसानीचे पंचनामे पाहता मोठा आर्थिक पॅकेज मिळेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री, खासदार हे पॅकेज मिळणार अशा पोकळ बढाया गेले दोन दिवस करत होते.मात्र कोकणवासीयांची घोर निराशा या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचा आरोप आ.नितेश राणे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा