ओरोस प्रतिनिधी
कुणाशी तरी बोलत असताना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तात्याराम गोविंदराव साठे ४९ सध्या राहणार इन्सुली राहणार कासरवाडी बीड याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी ३० हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अश्फाक शेख यांनी काम पाहिले.
पत्नी शोभा ही कुणाशीतरी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत असताना तिचे संभाषण आरोपीच्या कानावर पडले होते. यावरून तिच्यावर राग धरून त्याने त्याने पाळकोयत्याने तिच्यावर वार केले होते. त्यामुळे तिच्या गळ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली होती. १० जानेवारी २०२० रोजी पहाटे ४ सुमारास ही घटना घडली होती.
याबाबत प्रदीप सावंत, राहणार इन्सुली यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयितांवर भा.दं.वि. ३०७ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्यास्थितीत तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान मागिल आठ महिन्यांपासून न्यायालयाने कोठडीत असलेल्या या संशयित याने यापूर्वी केलेले जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. तर आता दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे .