You are currently viewing चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विजयी समरवीर’ या अल्बमचे प्रकाशन

चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विजयी समरवीर’ या अल्बमचे प्रकाशन

*चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विजयी समरवीर’ या अल्बमचे प्रकाशन*

पिंपरी

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे ‘विजयी समरवीर’ या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, विश्वस्त मिलिंद देशपांडे, शंकरशेठ जगताप, शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, प्रधानाचार्य पूनम गुजर, नटराज जगताप, अतुल आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या हौताम्याची सव्वाशे वर्षे या असा तिहेरी योग साधून पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ॲड. सतिश गोरडे यांच्या संकल्पनेतून या अल्बमची निर्मिती करण्यात आली आहे. शाहीर आसराम कसबे यांनी यांतील १) “विजयी समरवीर…” २) “एका आईची तीन पोरं…” ३) “सांत्वन करण्या आल्या भगिनी निवेदिता…” ४) “चापेकरांची शिकवण…” ५) “भगिनी निवेदिता…” अशा पाच गीतांचे लेखन केले आहे. शाहीर बापू पवार यांनी या गीतांना संगीतबद्ध केले असून शाहीर बापू पवार, रणजित खंडागळे, राधिका अत्रे, संदीप रोकडे आणि अनुराधा गायकवाड यांनी गीतांचे गायन केले आहे. अथर्व इंटरटेंमेंन्टच्या प्रवीण निसाळ यांनी व्हिडिओ एडिटिंग केले आहे.

या अल्बमविषयी अधिक माहिती देताना शाहीर आसराम कसबे यांनी, “लोकसंगीताचा बाज असलेल्या या शौर्यगीतांच्या माध्यमातून क्रांतिवीर चापेकर बंधूंची शौर्यगाथा समाजापर्यंत सांगीतिक माध्यमातून पोहोचवताना समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे ही कामगिरी केली आहे. त्यानिमित्ताने सामाजिक समरसतेचा प्रत्यय घेता आला!” अशी भावना व्यक्त करून अल्बममधील एका कवनाचे सादरीकरण केले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा