You are currently viewing भारतीय किसान संघ व नवजीवन मित्र मंडळ वाघोसेवाडी नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक पद्धतीने गोचिकित्सा प्रशिक्षण नेरूर येथे संपन्न

भारतीय किसान संघ व नवजीवन मित्र मंडळ वाघोसेवाडी नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक पद्धतीने गोचिकित्सा प्रशिक्षण नेरूर येथे संपन्न

*भारतीय किसान संघ व नवजीवन मित्र मंडळ वाघोसेवाडी नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक पद्धतीने गोचिकित्सा प्रशिक्षण नेरूर येथे संपन्न*

पशुपालन करताना जनावरांचे विविध आजार ही मोठी समस्या असते.त्यावरील उपचार पद्धती ही माहीत नसल्यास मोठे नुकसान होऊ शकते.हीच समस्या लक्षात घेऊन भारतीय किसान संघ व नवजीवन मित्र मंडळ वाघोसेवाडी नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा उपयोग करून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करता यावेत यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. गोळवण येथील *प्रसिद्ध पशुवैद्य श्री भाऊ परुळेकर यांनी जनावरांचे विविध आजार,लक्षणे, त्यावर उपयोगी असणाऱ्या वनस्पती,त्याचा उपयोग करण्याची पद्धती, घ्यावयाची काळजी आणि स्वतःचे प्रदीर्घ अनुभव* उपस्थित शेतकऱ्यांना सांगून मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणासाठी रत्नागिरी,मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 60 शेतकरी उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न समस्या जनावरांचे विविध आजार याविषयी मार्गदर्शक श्री भाऊ परुळेकर यांच्याशी संवाद साधला. *अशा प्रकारचे ज्ञान गावागावात सर्व पशुपालकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या प्रशिक्षणाला पशुवैद्यक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.*

वसुबारस निमित्त आयोजित कार्यक्रमात गोवत्सपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. *यावेळी नवजीवन मित्र मंडळ वाघोसेवाडी नेरुळ यांच्या वतीने महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री धनंजय मिसाळ यांच्या हस्ते पशुवैद्य श्री भाऊ परुळेकर यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एकनाथ सावंत (व्यवस्थापक, डॉ.हेडगेवार प्रकल्प) यांनी केले तर प्रास्ताविक भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री श्री धनंजय गोलम यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष श्री तानाजी सावंत, उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कुंभार, श्री मिलिंद पंत वालावलकर, जयराम परब ,रामचंद्र शृगारे ,स्वाती पिंगुळकर व नवजीवन मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + sixteen =