You are currently viewing चवे येथे जागतिक मृदा दिवस उत्साहात साजरा ….

चवे येथे जागतिक मृदा दिवस उत्साहात साजरा ….

रत्नागिरी

दरवर्षी दि ०५ डिसेंबर हा दिवस जागतिक पातळीवर माती दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षी जमीन जिवंत ठेवा जैवविविधतेचे रक्षण करा हे ब्रीवाक्य घेऊन शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारणीसाठी रिलायंस फाऊंडेशन व कृषी विभाग महाराष्ट्र शासन, रत्नागिरी व राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स लिमिटेड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील चवे गावातील शेतकऱ्यांबरोबर जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमध्ये माती परीक्षणाचे महत्व , माती परीक्षांचे नमुना करन्याची पद्धत , जमिनी महत्व या बद्दल मागदर्शन करण्यात आले . मा. उ. वि. कृ. अ. श्रीमती.नाईक नवरे मॅडम यांनी खतांचा सम् तोल वापर बाबत मार्ग दर्शन केले, श्री. मरगज सर (राष्ट्रीय केमिकल फेर्टीलाझर लिमिटेड ) यांनी माती परिक्षण महत्व माहिती दिली, श्री. वानखेडे, श्री. घवाळी प्रमुख शास्त्रज्ञ भाटे नारळ सशोंधन केंद्र यांनी माती नमुना कसा काढावा संबधी मार्गदर्शन केले,रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्ययस्थापक यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमाची व शेतीविषयक ध्वनी संदेश , व्हाट्सअँप द्वारे कसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात याची ,माहिती दिली . श्री. शेंडे सर कृ. वि. अधिकारी जि. प. रत्नागिरी यांनी जमीन सुपीकता निर्देशांक नुसार खत वापर बाबत माहिती दिली, श्री. शेंडगे सर कृ.स उ. वि. कृ. अ.कार्यालय यांनी खतांची शिफारस मात्रे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ता. कृ. अ श्री. हेगडे साहेब,म कृ अ श्री. अवेरे साहेब, BTM श्रीमती.हर्षला पाटिल,कृ प श्री. थोरात व मालगुंड मंडळातिल सर्व कृ स व कृ से उपस्थित होते.गावातील सुमारे ४० शेतकरी महिला सहभागी झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा