You are currently viewing सावंतवाडीत पाम तेलाचे फायदे व वापर विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

सावंतवाडीत पाम तेलाचे फायदे व वापर विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे पाम तेलाचे फायदे व त्याचा वापर या विषयावर एका दिवसीय कार्यशाळेचे आयोजन रसायनशास्त्र विभाग व एम पी ओ सी मलेशिया च्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मीना मेहता व डाॅ.बी.एच मेहता मुंबई हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल. रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस.एल वैरागे, रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डी.डी गोडकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. यू एल देठे. डॉ. डी बी शिंदे , डाॅ.युसी पाटील, डाॅ. वाय ए पवार, डाॅ. ए पी निकुम ,प्रा.डी. के मुळीक, प्रा. पी एम धुरी, प्रा. सुमंगल काळे ,प्रा. दर्शना मोर्ये, प्रा. प्रथमेश परब, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर मीना मेहता म्हणाल्या की पामतेलाचा वापर हा बेकरी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो,त्यामुळे बेकरी प्रॉडक्ट खूप दिवस टिकतात व त्याची चवही लोकांना आवडते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास पामतेलामध्ये कमी स्निघ्धता, अन्नपदार्थ टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे.जगभरात हे तेल वापरले जाते परंतु या तेलाबद्दल अपप्रचार असल्यामुळे याचा वापर लोक जेवणामध्ये करीत नाहीत.पाम तेल हे वनस्पती तेल असून आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही असा प्रचार जगभरात केला जातो परंतु हेच पामतेल मात्र बेकरी प्रॉडक्ट मध्ये सर्रास वापरले जाते व वर्षानुवर्ष हे बेकरी पदार्थ लोक आवडीने खातात.

पाम तेल निर्मिती ही मलेशिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर भारत देशामध्येही पाम वृक्षांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा