You are currently viewing पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी ताशी २० नॉटिकल वेगाची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देणार

पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी ताशी २० नॉटिकल वेगाची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देणार

*पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी ताशी २० नॉटिकल वेगाची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देणार*

*राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची आ. वैभव नाईक यांना ग्वाही*

*पारंपारिक मच्छिमारांचे प्रश्न व उपोषणा संदर्भात आ. वैभव नाईक यांनी घेतली मत्स्य आयुक्तांची भेट*

अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेली ताशी २० नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देण्याची ग्वाही राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांनी आमदार वैभव नाईक यांना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्ससीन बोटींद्वारे राजरोसपणे अनधिकृत मासेमारी सुरू असून पारंपारिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवला जात असल्याने अनधिकृत पर्ससीन बोटिंवर कडक कारवाई करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी मत्स्य आयुक्तांकडे केली आहे.

पारंपारिक मच्छिमारांना उद्भवत असलेल्या समस्या व प्रश्नांकडे मच्छीमारांनी आ. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. त्यासंदर्भात आज आ. वैभव नाईक यांनी मुंबई येथे राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची भेट घेत पारंपारिक मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. पारंपारीक मच्छीमार आपल्या न्याय हक्कासाठी दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मत्स्य व्यवसाय विभाग, मालवण कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.याकडे आयुक्तांचे लक्ष वेधत त्याबाबतचे निवदेनही दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर मागील काही दिवस १२ वावच्या आत पर्ससीन बोटींद्वारे अनधिकृत मासेमारी करण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील पारंपारीक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. मत्स्य विभागाकडे हायस्पीड गस्ती नौका नसल्याने पर्ससीन बेटींना पकडता येत नाही. कारवाईसाठी हायस्पीड गस्ती नौकेची आवश्यकता असून लवकरत लवकर ती देण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांनी ताशी २० नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.

*डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम पुढील ८ दिवसांत देण्याचे केले मान्य*

डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम देखील देण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी मत्स्य आयुक्तांकडे केली. त्यावर पुढील ८ दिवसांत डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम देखील देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. मत्स्य विभागातील अपुऱ्या कर्मचारी वर्गाकडे त्यांनी लक्ष वेधत पद भरती करण्याची मागणी केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारीक मच्छीमारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा