संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेली आरक्षणाची लढाई यशस्वी व्हावी…
बांदा मराठा समाजाच्या वतीने श्री देव बांदेश्वर भूमिका देवीला साकडे…
बांदा
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे व समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेली आरक्षणाची लढाई यशस्वी व्हावी यासाठी आज बांदा मराठा समाजाच्या वतीने श्री देव बांदेश्वर भूमिका देवीला साकडे घालण्यात आले.
राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या समितीने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्याने आरक्षण मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमरण उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. त्यांनी सायंकाळी उशीरा आपले उपोषण मागे घेतले. राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेले आंदोलन देखील समाज बांधवानी मागे घ्यावे असे आवाहन केले होते.
त्यानुसार आज सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्याचे रद्द करण्यात आले. आज सकाळी श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सचिव म. गो. सावंत, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, गोविंद सावंत, राजा सावंत, विराज परब, निलेश कदम, दीपक सावंत, राजेश सावंत, परिमल सावंत आदिसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*