बांदा येथे विजेचा पोल कलंडला, सुदैवाने दोन कर्मचारी बचावले…
बांदा
येथील कन्याशाळेसमोर गटाराचे खोदकाम सुरू असताना वीजेचा पोल कलंडल्याने विद्युत भारीत वाहिन्या रस्त्यावर कोसळल्या. बांदा खेमराज हायस्कूलचे शिपाई श्री. गोळवणकर व निवृत्त ग्रामविकास अधिकारी संदीप बांदेकर हे या घटनेत बालंबाल बचावले. समोरून उच्च माध्यमिकचे विद्यार्थी येत होते. अगदी काही सेकंदाचा अवधी असताना ही घटना घडली. माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.
बांदा कन्या शाळेसमोर गटाराचे काम सुरू आहे. ठेकेदाराने वीज पोलनजीकच खोदकाम केल्याने पोल अचानकपणे कलंडला. त्यामुळे वीज वाहिन्या रस्त्यावर कोसळल्या. श्री. गोळवणकर व संदीप बांदेकर यांच्या समोरच वाहिन्या पडल्या. त्यामुळे दोघेही खाली कोसळले व त्यांनी धूम ठोकली. समोरील टेंपोवर वाहिन्या अडकल्याने ते बचावले. माजी ग्रा. पं. सदस्य हुसेन मकानदार यांनी ठेकेदाराच्या हलगर्जी कामाबाबत संताप व्यक्त केला. वीज पोल नजीक जेसीबीने खोदकाम न करता कामगारांकडून खोदकाम करण्याची मागणी केली. कोणतीही दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. यावेळी शाम धुरी यांनी मदतकार्य केले. घटनेची माहिती देण्यासाठी संपर्क केला असता नेहमीप्रमाणे बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांचा मोबाईल बंद लागत होता.
संवाद मीडिया*
🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮
*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*
तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*
*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट
भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.
आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!
*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*
अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*
ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*