वीजदेयके शंका निरसन करण्यासाठी महावितरण कंपनी ग्राहक भेटीला
महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली आहे .
जगावर आलेल्या कोरोना संकटाने महाराष्ट्र राज्यात मार्च महिन्या पासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे, पुन्हा बिल देणे या सर्वच बाबी स्थगित करण्यात आल्या होत्या. याच कालावधीत वीज ग्राहक आपल्या घरी वीजेचा वापर करत होते व या सर्व वापराची नोंद जुलै महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडिंग मिळाल्यावर करण्यात आली. यामुळे सलग तीन महिन्याची एकत्र देयके मीटर रीडिंग अनुसार ग्राहकांना देण्यात आली आहेत. या एकत्र देयकामध्ये महीना निहाय स्लॅब बेनिफिट देण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्राहकांच्या मनामध्ये लाँगडाऊन कालावधीतील विविध कामांबाबत अद्यापही काही शंका असण्याची बाब लक्षात घेऊन मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचे अधिकारी थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांत जवळच्या कार्यालयामध्ये पुढीप्रमाणे उपस्थित राहणार आहेत.
1. चौके शाखा दि. 7, 8 व 9 डिसेंबर,
2. कट्टा शाखा दि., 10,11 व 12 डिसेंबर
3. मालवण शहर शाखा दि. 7, 8 व 9 डिसेंबर
4 मालवण ग्रामीण 1 शाखा दि. 7, 8 व 9 डिसेंबर 5 मालवण ग्रामीण 2 शाखा दि. 10, 11 व 9 डिसेंबर.
वरील सर्व ठिकाणी विजेच्या देयका बाबत ग्राहकांच्या सर्व शंका निरसन करून दिले जाणार असून वीज ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून सकाळी दहा वाजता संबंधित अधिकारी उपस्थित राहतील असे कार्यकारी अभियंता, कणकवली यांनी कळविले आहे.