You are currently viewing महामार्गावर नडगिवे येथे दारू वाहतूक करणारा टेम्‍पो पलटी

महामार्गावर नडगिवे येथे दारू वाहतूक करणारा टेम्‍पो पलटी

महामार्गावर नडगिवे येथे दारू वाहतूक करणारा टेम्‍पो पलटी

८ लाख ७८ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू कणकवली पोलिसांनी केली जप्त

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील नडगिवे बांबरवाडी येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा आयशर टेम्‍पो पलटी झाला. काल (ता.१) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर चालक आणि त्‍याचा सहाय्यक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. तर टेम्‍पोमधील ८ लाख ७८ हजार ४०० रूपये किंमतीचा दारूसाठा कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे.

गोवा येथून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्‍पो (जीजे ०१ जेटी ५७९२) जात होता. नडगिवे बांबरवाडी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकला आदळून गोवा ते मुंबई या लेनवर टेम्‍पो पलटी झाला. अपघातानंतर टेम्‍पोमधील गोवा बनावटीचे दारूचे बॉक्‍स आणि त्‍यामधील बाटल्‍या रस्त्यावर विखूरल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस उद्धव साबळे घटनास्थळी तातडीने हजर झाले. त्‍यानंतर खारेपाटण येथून जेबीसी मशिन मागवून महामार्गावरील दारू साठा तसेच अपघातग्रस्त टेम्‍पो हटविण्यात आला. तर टेम्‍पोमध्ये गोवा बनावटीच्या १७ हजार ५६८ दारूच्या बाटल्‍या आढळून आल्‍या. त्‍याची किंमत ८ लाख ७८ हजार ४०० रूपये आहे. या अपघात प्रकरणी कणकवली पोलिसांनी टेम्‍पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =