दिल्ली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज दिल्लीत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटवर होते. त्यांच्या मेंदूवर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनानंतर नेते आणि मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रणवदांचा सन्मान करत होते. ते एक विद्वान होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदुवर काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज त्यांचे निधन झाले. त्यांचा पुत्र अभिजीत यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.