You are currently viewing कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी

कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी

*कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी*

*शिवसेना नेत्यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांना आवाहन*

*शिवसेना नेत्यांनी घेतली कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक*

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकाने मैदानात उतरले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पदवीधर आहेत मात्र मतदार नोंदणी न केल्याने ते मतदानापासून वंचित राहतात. अशा प्रत्येकापर्यंत आपल्याला पोहोचले पाहिजे. मतदार नोंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने किमान ५ जणांची मतदार नोंदणी करावी आणि निवडणुकीवेळी त्या मतदारांना मतदानाला घेऊन जावे तसे आतापासून नियोजन केल्यास निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी कणकवलीत केले.

कोकण पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई,आमदार वैभव नाईक,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, समन्वयक प्रदीप बोरकर, कोकण पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक रविवारी कणकवली येथील मातोश्री हॉल येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना नेत्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेतेपदी विनायक राऊत व शिवसेना सचिवपदी वरुण सरदेसाई यांची निवड झाल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,युवासेना जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, विक्रांत जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गितेश राऊत,रुची राऊत,राजू शेटये, सचिन सावंत,शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर,रामू विखाळे, कन्हैया पारकर,संतोष परब,राजू राठोड,मंगेश सावंत,बंडू ठाकूर,राजू रावराणे,बाबू पेडणेकर,रुपेश आमडोस्कर,वैदेही गुडेकर, तेजस राणे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके,गणेश गावकर,फरीद काझी,रोहित पावसकर, नितेश भोगले, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे,दिव्या साळगावकर,संजना कोलते,धनश्री कोलते,माधवी दळवी यांसह शिवसेना,युवासेना, महिलाआघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा