You are currently viewing अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या 16 इसमांवर कारवाई…

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या 16 इसमांवर कारवाई…

 – पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे

सिंधुदुर्गनगरी 

कुडळ तालुक्यातील मौजे बांब, तिरांबीवाडी येथे शिकारीसाठी शस्त्रांसह फिरत असलेल्या 16 इसमांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.सदर आरोपी यांच्याकडुन 6 काडतुस बंदुका, 7 काडतुसे, 5 मोटार सायकली व 1 रिक्षा असा सुमारे असा 4 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे यांनी दिली.     

     अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांच्यावर  कारवाई पोलीस अधीक्षक  राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल धनवडे, पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, गुरुनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर, रवि इंगळे, चंद्रहास नार्वेकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − six =