You are currently viewing ०४ नोव्हेंबर रोजी श्यामची आई कृतज्ञता सोहळा

०४ नोव्हेंबर रोजी श्यामची आई कृतज्ञता सोहळा

*०४ नोव्हेंबर रोजी श्यामची आई कृतज्ञता सोहळा*

पिंपरी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे दुपारी ०४:०० वाजता श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तसेच टाटा मोटर्स उद्योगसमूहाचे मनोहर पारळकर आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात रहाटणी येथील भिकोबा तांबे मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश काळे यांना (श्याम) आणि त्यांच्या मातोश्री द्रौपदाबाई शंकरराव काळे यांना (श्यामची आई) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर (सानेगुरुजी विचारसाधना पुरस्कार), वि. दा. पिंगळे, सुनीता पवार, सायली संत (सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार) यांना तसेच चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल या शाळेला (सानेगुरुजी संस्कारक्षम शाळा पुरस्कार) सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा