You are currently viewing हडी, तोंडवळी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची धडक कारवाई
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

हडी, तोंडवळी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची धडक कारवाई

मालवण:

 

अनधिकृतरित्या वाळू उपशा विरोधात तहसीलदार, पोलीस आणि बंदर विभागाने रात्री संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत हडी व तोंडवळी येथील वाळू उपशाच्या पाच नौका बुडवित त्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

हडी व तोंडवळी येथील खाडी पात्रात अनधिकृतरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह तलाठी डी. सी. ठाकूर, व्ही. एम. राठोड, बंदर विभागाचे कर्मचारी साहेबराव कदम, मंडळ अधिकारी श्रीमती एम. एस. चव्हाण, आर. एस. शेजवळ यांच्या यांच्या संयुक्त पथकाने हडी व तोंडवळी येथे धडक कारवाई केली. यात पाच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या नौका आढळून आल्या. या नौकांवर वाळू आढळून आली. मात्र कोणत्याही व्यक्ती दिसून आल्या नाही. यातील काही नौका या लोखंडाच्या तर काही लाकडी होत्या. या पाचही नौका खाडीपात्रात बुडवून नष्ट करण्याची कार्यवाही पथकाकडून करण्यात आली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा