You are currently viewing गुटखा बाळगल्याप्रकरणी देवगड येथे एकाला अटक…

गुटखा बाळगल्याप्रकरणी देवगड येथे एकाला अटक…

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई; टेम्पोसह ८६ हजाराचा गुटखा जप्त

सिंधुदुर्गनगरी
गुटखा बाळगल्याप्रकरणी देवगड-दाभोळे येथून एकाला सापळा रचून सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून तब्बल ८६ हजार ४० रुपये किंमतीच्या गुटख्यासह सह दीड लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.नवरतन नामदेव विश्वकर्मा वय ४७, रा.वळकूवाडी-जामसंडे,असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी अन्नसुरक्षा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.ही कारवाई अधीक्षक यांच्या सूचनेनुसार श्री.धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके, हवालदार गुरुनाथ कोयंडे, रवी इंगळे,संकेत खाडे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा